सनी लिऑनचा ३२वा वाढदिवस, सनी झाली हीट

पॉर्न स्टार ते बॉलिवूडची नटी सनी लिऑन १३ मेला ३२ वर्षाची झाली. बॉलिवूडमध्ये तिने जिस्म-२ या सिनेमाने पदार्पण केले.

Updated: May 14, 2013, 04:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पॉर्न स्टार ते बॉलिवूडची नटी सनी लिऑन १३ मेला ३२ वर्षाची झाली. बॉलिवूडमध्ये तिने जिस्म-२ या सिनेमाने पदार्पण केले. ऑनलाईन आणि पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त सर्च केली जाणारी सेलिब्रेटी सनी लिऑन आहे. सनी लिऑन आपल्या हॉट अंदाजामुळे अल्पावधीतच खूप `हिट` झाली आहे.
`बिग बॉस`मध्ये एंट्री केल्यानंतर तिचे फॅन्स वाढत गेले. सनीने बिग बॉसमध्ये एंट्री केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु याच रियालटी शोने तिला बॉलिवूडचे तिकिट मिळवून दिले. सनीने `जिस्म-2`मध्ये आपल्या मादक शरीराचा परिपूर्ण वापर करून घेतला होता.
`जिस्म-2`च्या माध्यमातून सनीचा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. `जिस्म-2`मध्ये अंगप्रदर्शन करणारी सनी बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकली नाही. परंतु आज सनी बॉलिवूडची `हॉट प्रॉपर्टी` बनली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.