सुधा मूर्तींच्या कादंबरीवर ‘पितृऋण’ सिनेमा

लेखिका सुधा मूर्ती यांच्या ‘पितृऋण’ या कादंबरीवर आधारित ‘पितृऋण’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सचिन खेडेकरची दुहेरी भूमिका, बॉलिवूड अभिनेत्री तनुजाची महत्वपूर्ण भूमिका आणि नितीश भारद्वाजचं दिग्दर्शनात पदार्पण या सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक रिव्हिल करण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 5, 2013, 03:12 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
लेखिका सुधा मूर्ती यांच्या ‘पितृऋण’ या कादंबरीवर आधारित ‘पितृऋण’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सचिन खेडेकरची दुहेरी भूमिका, बॉलिवूड अभिनेत्री तनुजाची महत्वपूर्ण भूमिका आणि नितीश भारद्वाजचं दिग्दर्शनात पदार्पण या सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक रिव्हिल करण्यात आलाय.
सुधा मूर्तींच्या कादंबरीवर आधारित `पितृऋण` लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आयएमई मोशन पिक्चर्स निर्मित आणि नितीश भारद्वाज दिग्दर्शित हा सिनेमा आहे. कृष्णाच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेले आणि दोनदा खासदार असलेले नितीश भारद्वाज या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत.
हा चित्रपट ख्यातनाम लेखिका सुधा मूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे. अजून एक आनंदाची बाब म्हणजे अभिनेत्री तनुजा या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मराठीत झळकणार आहेत. त्यांना साथ देणार आहेत सुहास जोशी आणि सचिन खेडेकर हे दिग्गज कलावंत.

व्हिडिओ पाहा - फर्स्ट लूक : पितृऋण

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.