आमिर सलमानच्या भेटीला, सल्लूचा भाव ८० कोटींवर

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने सलमान खानच्या दबंग-२ च्या शुटिंग सेटला भेट देऊन त्याला चकित केलं. तर दुसरीकडे दबंग, बॉडीगार्ड, टायगर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खानचा भाव भलताच वधारला आहे. त्यांने आपल्या मानधनात कमालीची वाढ केली आहे. आता तो एका चित्रपटासाठी ८० कोटी रूपयांची मागणी करताना दिसत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 5, 2012, 04:59 PM IST

www.24taas.com, मुंबई
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने सलमान खानच्या दबंग-२ च्या शुटिंग सेटला भेट देऊन त्याला चकित केलं. आमिरने स्वत:चा एक वेगळा स्टेटस् निर्माण केला आहे. त्यामुळे क्वचितच एखाद्या दुसऱ्या चित्रपटाच्या सेटवर जाणाऱ्या आमिरनं दबंगला सरप्राइज केलं. त्यामुळे त्यांच्यातील दोस्तीचा नजरा दिसून आला.
आमिरला जेव्हा कळलं की, सलमान जवळच्याच मेहबूब स्टुडिओत शूटींग करत आहे. त्यावेळी स्वत:च्या पॅकअपनंतर आमिर सलमानला भेटायला तिथे पोहोचला. आमिरच्या या सरप्राईज भेटीने सल्लू अधिकच खूश झाला. यावेळी या दोघा मित्रांनी गप्पा मारल्या. अंदाज अपना अपनाचे दिवस आठवून हास्य विनोद केलं.
‘तलाश’च्या हेक्टिक प्रमोशन शेड्युलमधून वेळात वेळ काढून आमिर ‘दबंग २’ च्या सेटवर पोहोचला. आमिरची ही सरप्राईज व्हिजीट सल्लूसाठी खास होती.
सलमानने निर्मात्यांना फोडला घाम
दबंग, बॉडीगार्ड, टायगर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खानचा भाव भलताच वधारला आहे. त्यांने आपल्या मानधनात कमालीची वाढ केली आहे. आता तो एका चित्रपटासाठी ८० कोटी रूपयांची मागणी करताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना घाम फुटला आहे.

सलमानचे `दबंग`, `रेडी`, `बॉडीगार्ड`, `एक था टायगर` हे चित्रपट तुफान चाललेत. त्यामुळे सलमान खानला मागणी वाढली. त्यातच तो आता बिग बॉसच्या सेटवर हिट ठरला आहे. त्याचा चाहता वर्ग वाढल्याने त्याचा भावही वधारला आहे. त्यामुळे बॉलीवूडचा टायगर सलमान खानने भाव वाढवला आहे. निर्माते साजिद नाडियादवाला यांच्या ‘किक` या चित्रपटासाठी त्यांने चक्क ८० कोटी रूपयांची मागणी केली आहे.
किक या चित्रपटासाठी सुरवातीला सलमानने ७० कोटींची मागणी केली होती; मात्र त्याला मिळणारी प्रसिद्धी आणि दंबग-२चा बोलबाला लक्षात घेऊन सलमाने आणखी १० कोटी रूपये मागितल्याने नाडियादवालासह अन्य निर्मात्यांना जोरदार किक बसली आहे.
सलमानला घेऊन ‘किक` चित्रपट बनविण्याची घोषणा साजिद नडियादवाला यांने केल्यानंतर काही दिवसांतच सलमानने मानधन वाढवले. साजिद नडियादवालाशी मैत्री असतानाही त्याने मानधन १० कोटी रूपयांनी वाढवून मागितले. याबाबत साजिद सलमानशी बोलणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सलमान किक या चित्रपटासाठी नेमकी किती रक्कम घेणार, हे काही दिवसांतच कळेल. सलमानचा दबंग-२ रिलीज होणार असल्याने सलमानचा हा भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
तर याआधी अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्यापाठोपाठ सलमान खानने फेसबुकवर खाते उघडले. फेसबुकवर गेल्यावर केवळ अर्ध्या तासात सलमानला तब्बल दोन लाख ६० हजार ‘लाईक्स ` मिळाल्या. त्यावरून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.