www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आज विवाहबंधनात अडकणार आहे. मराठमोळ्या अक्षय वरदे याच्यासोबत ती लग्न करतेय.
अयक्ष वरदे याचा मोटारसायकल कस्टमायजेशनचा बिझनेस आहे. `वर्देंची` हा ब्रॅन्डचा तो निर्माता आहे. समीरा आणि अक्षय एकमेकांना गेल्या अडीच वर्षांपासून डेट करत आहेत. डिसेंबर महिन्यात समीराच्या बांद्रास्थित घरामध्येच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.
आपण डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचं यापूर्वी समीरानं म्हटलं होतं. परंतु, एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, समीरा ही आजच विवाहबंधनात अडकणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लग्नसोहळा खाजगीरित्या पार पडणार आहे. यामध्ये समीरा आणि अक्षय यांचे काही निवडक मित्र आणि नातेवाईक मंडळी सहभागी होणार आहेत. हा सोहळा गुप्त पद्धतीनं पार पाडण्यासाठी तयारी केली जातेय. समीरा हिची आई नक्षत्रा रेड्डी यांनी या बातमीला दुजोरा दिलाय. या लग्न सोहळ्यासाठी अक्षय आणि समीरा यांचे कपडे नीता लल्ला यांनी डिझाइन केलेत.
अक्षयप्रमाणेच समीरालादेखील बाइकचं वेड आहे. ती आत्तापर्यंत `वर्देंची`ची बाईकच वापरत होती. एके दिवशी तिची आणि अक्षयची ओळख झाली आणि काही दिवसांतच या ओळखीचं मैत्रित रुपांतर झालं.
समीराच्या एका अत्यंत सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, अक्षयला आपला बिझनेस मोठा करायचाय. त्यामुळे तो नंतर खूपच व्यस्त राहील. यामुळे, या दोघांनी जानेवारी महिन्यातच विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.