`रामलीला`मध्ये प्रियांका चोप्राचं आयटम साँग

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने बबली बदमाश,पैसेवाल्यांची पिंकी बनून आयटम साँग केलं होतं...आता पुन्हा एकदा ती रामलीला सिनेमात आयटम साँगसाठी रुपेरी प़डद्यावर आपले जलवे दाखवण्यासाठी थिरकणार आहे....

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 15, 2013, 02:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने बबली बदमाश,पैसेवाल्यांची पिंकी बनून आयटम साँग केलं होतं...आता पुन्हा एकदा ती रामलीला सिनेमात आयटम साँगसाठी रुपेरी प़डद्यावर आपले जलवे दाखवण्यासाठी थिरकणार आहे....
‘बदमाश बबली’ आणि पैसेवाल्यांची ‘पिंकी’ बनून झाल्यानंतर आता देसी गर्ल पुन्हा एकदा आयटम साँग करण्यास सज्ज झाली आहे. यावेळी तिची टक्कर आहे दिपीका पादूकोणशी असणार आहे. संजय लीला भन्साळीच्या ‘रामलीला’मध्ये प्रियांका आयटम साँग करणार आहे...
‘रामलीला’ मधील रणवीर-दिपीकाच्या इंटिमेट सीन्समुळे त्यांच्या प्रत्येक गाण्याला फॅन्सचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र आता त्यांच्यामध्ये देसी गर्लने आयटम साँगच्यामाध्य़मातू एंट्री घेणार आहे...
खरं तर प्रियांकाने यापूर्वी करिना आणि कतरीना यांच्याशी टक्कर घेतली. ती कधी ‘बबली बदमाश’ बनून तर कधी ‘पिंकी’ बनून रुपेरी पडद्यावर थिरकलीय. आपल्या दिलखेच आदाकारीतून पिंकीने आपल्या चाहत्यांचं ह्रदय घाय़ाळ केलं होतं. पिंकीची अदा बघितल्यानंतर तुम्हाला ‘चिकनी चमेली’ची कतरीना आणि ‘हलकट जवानी’ची करीना कपूरची आठवण झाली असेल. कारण पिंकीचे लटके झटकेही तसेच होते.
आयटम साँगच्या स्पर्धेत कतरीना आणि करीनाने आपल्या आदाकारीने चाहत्यांना ठेका धरायला भाग पाडलंय. करीना आणि कतरीनाच्या या आयटम साँगला त्यांच्या चाहत्यांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं होतं. या स्पर्धेत प्रियांकाही काही मागे नाही. आता पुन्हा एकदा प्रियांका आयटम साँग करणार असून रामलिला ती नव्या अवतारातात दिसणार आहे. तिच्या या आयटम साँगची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.