पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रामध्ये जुंपली

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने काही दिवसापूर्वी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्या एका वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवली होती.

Updated: Jun 5, 2013, 04:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने काही दिवसापूर्वी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्या एका वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवली होती. मल्लिकाच्या मते, भारतीय समाज हा स्त्रियांच्या बाबतीत मागासलेला आहे. त्यावरच मल्लिकाची तिने खिल्ली उडवली होती. आता या दोघींनंतर बिकनी गर्ल पूनम पांडे आणि कामसूत्र फेम शर्लिन चोप्रा यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
शर्लिनने मल्लिकाचीच री ओढीत भारतीय समाजावर टीका केली आहे, महिलांच्या बाबतीत भारत मागासलेला आहे आणि निराशाजनक देश आहे. येथे काम करणं कठीण आहे. असं शर्लिनने म्हंटले आहे. त्यालाच उत्तर देत पूनम पांडेने आपल्या ट्विटरवर ट्विट केलं, ‘भारताच्या याच मागासलेल्या समाजाने मल्लिका शेरावतला स्टार बनविलं आहे.’
कान्समध्ये झालेल्या ६६ व्या आतंरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवाच्या दरम्यान मल्लिकाने केलेल्या वक्तव्याने प्रियंका चांगलीच उखडली होती. `माझ्या मते, आम्ही प्रगतशील देश आहोत, मी या मताशी कधी सहमत नाही, की आम्ही मागासलेले आहोत.`

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.