www.24taas.com, लॉसएंजिल्स
एण्ड द ऑस्कर गोज टू...जगभरातल्या चाहत्यांचे लक्ष वेधलेल्या ८५ व्या ऑस्कर सोहळयाला सुरुवात झालीय...जगातलं सगळ्य़ात मोठं रेड कार्पेट अंथरलं गेलंय.
जगभरातल्या कलाकारांची वर्दळ कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये झालीय. यंदाच्या ऑस्करमध्ये लाईफ ऑफ पाय या सिनेमाला ११ नामांकन आहेत तर स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या लिंकन सिनेमाला १२ नॉमिनेशन मिळाल्येत. त्यामुळे या दोन्ही सिनेमामंध्ये चुरस पाहायला मिळतेय तर सिल्व्हर लाईनिंग प्ले बूक या सिनेमाला ८ नामांकन आहेत त्यामुळे हाही सिनेमा या ऑस्करच्या रेसमध्ये आहे.
यंदाच्या ऑस्करचं वैशिष्ट्य म्हणजे लाईफ ऑफ पाय हा सिनेमा परदेशी दिग्दर्शकाने केला असला तरी यात काम करणारे कलावंत भारतीय आहेत.
या सिनेमाचं बरचंस शूटिंगदेखिल भारतातच झालंय तसंच best orignal score साठी याच सिनेमातील एका गाण्यासाठी चैन्नईमधील शास्त्रीय गायिका बॉम्बे जयश्री रामनाथला नामांकन मिळालंय त्यामुळे आता या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहचलीय.
पुरस्कार प्राप्त
- 'पेपरमॅन' ने बेस्ट एनीमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार
- ब्रिटिश कॉस्ट्यूम डिजाइनर जॅक्लीन डुरैन यांना 'एना कैरेनीना' या चित्रपटासाठी
- 'लेस माइजरेबल' ला मेकअप आणि हेयरस्टाइलिंगचा ऑस्कर
- 'कर्फ्यू' या चित्रपटाला लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर
- 'अमोर' फिल्मचे निर्देशक माइकल हेनेक
- बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म 'अमोर' (ऑस्ट्रिया)
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार ख्रिस्तोफ वॉल्ट्झ याला 'जांगो अनचेन्ड' चित्रपटासाठी
- 'सर्चिंग फॉर शुगरमॅन' ला सर्वोत्कृष्ट डॉम्युमेंट्रीचा पुरस्कार
- बेस्ट सिनेमेटोग्राफी - लाईफ ऑफ पाय