www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सनी लियॉनला आता पोर्न चित्रपट करायचा नाहीय, तिला या सर्व व्यापातून बाहेर यायचंय.
अमेरिकेत एडल्ट स्टार म्हणून ओळखली जाणारी सनी लियॉनला, भारतातही प्रसिद्धी मिळाली ती एडल्ट स्टार म्हणूनच, रियालिटी शो बिग बॉसमध्ये सनी लियॉनचा प्रवेश याच कारणामुळे झाला.
पॉर्न स्टार ही ओळख पुसून टाकण्यासाठी सनी लियॉनने प्रयत्न सुरू केलेत.
भुतकाळ कोण बदलू शकतं?
मी़डियाशी बोलतांना सनी लियॉन म्हणते, एक लक्षात घ्या, माझा जो भुतकाळ आहे, तो मी बदलू शकत नाही, पण मी पूर्ण प्रयत्न करतेय की लोकांचा माझा विषयीचा दृष्टीकोन बदलावा. मला आता अजिबात वाटत नाही, की मला एक पॉर्न स्टार म्हणून ओळखलं जावं.
पण सनी लियॉन पुढे म्हणते, मला मात्र गर्व आहे की, मी एक मनुष्य म्हणून जशी आहे, तशीच राहणार आहे.
सनी लियॉन विस्तृतपणे बोलतांना म्हणाली, मी बिग बॉसमध्ये येण्याआधीच पॉर्न फिल्म करणं बंद केलं आहे, आणि आता कधीही असले चित्रपट करणार नाही.
सनी लियॉनचे पतीशी मतभेद
काही दिवसांआधी एक बातमी आली होती की, सनी लियॉनचा पती डेनियल वेबर आणि सनीमध्ये मतभेद सुरू आहेत. सनी लियॉनने या बातम्या चुकीचं असल्याचं सांगितलं.
सनी याविषयी बोलतांना म्हणाली, मी माझ्या पतीवर प्रचंड प्रेम करते, आणि साऱ्या जगानं हे लक्षात ठेवावं, की माझ्या पतीला मी कधीही सोडणार नाहीय.
शो होस्ट करणार
सनी लियॉन लवकरच `स्प्लिट्सविला` या शो होस्ट करणार आहे. शो होस्ट करण्याची सनीची ही पहिली संधी असेल.
हा शो होस्ट करणे माझ्यासाठी कठीण आहे, कारण यात चित्रपटांसारखी स्क्रीप्ट नाहीय.
स्पर्धेत स्वत:ला टीकवून ठेवण्यासाठी आपल्याला सर्व काही करून दाखवावं लागतं. माझ्यासाठी हे एक मोठं आव्हान आहे, यात मला आनंदही मिळणार असल्याचं सनी लियॉनने म्हटलं आहे.
शर्लिन चोपडा सुंदर आणि सेक्सी
सनी लियॉन आधी हा शो शर्लिन चोपडा होस्ट करत होती. यामुळे शर्लिन चोपडाशी आपली तुलना केली जाईल याची जाणीव सनी लियॉनला होती.
सनी लियॉन शर्लिन चोपडा विषयी म्हणते, मला शर्लिन चोपडा सुंदर आणि सेक्सी वाटली, मी ही शर्लिन सारखं चांगलं काम करून दाखवेन, अशी मला अपेक्षा आहे.
या वर्षी सनी लियॉनवर चित्रित करण्यात आलेलं रागिनी एमएमएस-2 मधील गाणं, बेबी डॉल आतापर्यंतचं सर्वात हिट गाणं ठरलं आहे. सनी लियॉनचा आता `टीना एँड लोलो` आणि `मस्तीजादे` सिनेमा येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.