www.24taas.com राजकोट
बहुचर्चित ‘कुबेर’ बोटीच्या मालकानं ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या सिनेमाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना नटीस धाडलीय. मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी मुंबईत शिरण्यासाठी ‘कुबेर’ बोटीचा वापर केल्याचं तपासात स्पष्ट झालं होतं.
राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ‘कुबेर’ बोटीचं नावचं नाही तर या बोटीचा लायसन्स नंबरचाही आपल्या ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या सिनेमात बेकायदेशीरपणे केल्याचा दावा कुबेर बोटीचे मालक मालिक हिरालाल मसानी यांनी केलाय. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली होती. आज, हा सिनेमा ठिकठिकाणी प्रदर्शित झालाय.
राम गोपाल वर्मा यांनी विनापरवानगी आपल्या बोटीचं नाव आणि लायसन्स नंबरचा वापर आपल्या सिनेमात केलाय, असं मसानी यांचं म्हणणं आहे. कुबेर या बोटीची नोंदमई पोरबंदरमध्ये करण्यात आलंय. २६ नोव्हेबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत आलेल्या दहा दहशतवाद्यांनी याच बोटीचं भरसमुद्रात अपहरण केलं होतं.