www.24taas.com, मुंबई
कमाल राशिद खान ऊर्फ केआरके हा ट्विटर अत्यंत सवंग आणि वाह्यात विधानं करण्यासाठी कायम तयार असावा. यापूर्वी सनी लिऑनबद्दल अश्लिल पोस्ट टाकून आपण सनी लिऑनच्या ‘तसल्या’ फिल्म्स ‘तसले’ सीन्स रिवाइंड करत पुन्हा पुन्हा कसे पाहातो, हे त्याने ट्विटरवर लोकांना सांगितलं होतं. तर एकता कपूर आणि पूजा भट्ट यांना अश्लिलमार्तंड बनून उपदेशही केले होते. आता मात्र कमाल खानने ‘कमाल’च केली आहे. त्याने चक्क हुमा कुरेशीकडे सेक्सची मागणी केली हे.. ते ही ट्विटरवर बोभाटा करत.
केआरकेने ट्विट केलंय, “हूमा, तुला वाईट वाटणार नसेल, तर एक विचारू का? हूमा, तू माझ्याबरोबर सेक्स करशील का? मी तुझा एफएचएम मासिकावरचा फोटो पाहिला. तू खूपच सेक्सी दिसतेस. गँग ऑफ वासेपूर-२ हा सिनेमा तर मी नव्वळ चुझ्यासाठीच पुन्हा बघतोय... कीप रॉकींग”
कमाल राशिद खान हा एक बिझनेसमन, अभिनेता आणि निर्माता आहे. तो बिग बॉसमध्येही काही काळापूर्वी आला होता. आपल्य अत्यंत अर्वाच्य बोलण्यामुळे, हिंसक वागण्यामुळे त्याला बिग बॉसमधूनही हाकललं होतं. आता ट्विटरवर आपला वाह्यातपणा करत केआरके प्रसिद्धी मिळवत आहे. केआरकेच्या या अश्लिल मागणीला हूमा काय प्रतिसाद देतेय हे लवकरच कळेल.