कतरिनाच कपूर खानदानाची भावी सून- बेबो

बॉलिवूडचं सर्वात चर्चेत असलेलं कपल आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय... ते ही आपल्याच घरच्यांच्या वक्तव्यामुळं... बातमी अशी आहे की, रणबीरची चुलत बहिण असलेल्या नवाब खानच्या बायकोनं बेबोनं... चक्क कतरिनाचा उल्लेख ‘भाभी’ म्हणून केलाय.

Updated: Dec 3, 2013, 09:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचं सर्वात चर्चेत असलेलं कपल आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय... ते ही आपल्याच घरच्यांच्या वक्तव्यामुळं... बातमी अशी आहे की, रणबीरची चुलत बहिण असलेल्या नवाब खानच्या बायकोनं बेबोनं... चक्क कतरिनाचा उल्लेख ‘भाभी’ म्हणून केलाय.
सध्या बॉलिवूडमध्ये नवीन कपल म्हणून चर्चेत असलेले रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे नुकतेच स्पेनमधील एका समुद्र किनारी फिरताना दिसले होते. त्यामुळं परत एकदा त्यांच्या चर्चेला उधाण आलाय. तसंच या दोघांमध्ये संबंध असून हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याचीही देखील चर्चा आहे.
रणबीर कपूरची चुलत बहिण करिना कपूरनं कतरिनाला ‘भाभी’ म्हणून रणबीर आणि कतरिना यांना पुन्हा एकदा चर्चेत आणलंय. करण जोहर दिग्दर्शीत ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात करिना कपूर सहभागी झाली होती. त्यावेळी करणनं करिनाला एक प्रश्न विचारला की, ‘अगर बंदूक की नोक पर आपका किसी महिला से एनकाऊंटर होता है, तो आप किसे चुनना चाहेंगी’ यावर करिनानं सांगितले की, मला नाही माहिती मी माझा वहिनी बरोबरच जास्त सुखरुप आहे. करिनानी वहिनी हा शब्द खुद्द कतरिना कैफसाठी वापरला. करिनाच्या या वक्तव्यानंतर दोघांनी ही या विषयावर काहीही न बोलनंच ठरवलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.