राजकीय चित्रपटंबद्दल प्रसिद्ध असलेल्या प्रकाश झा यांच्या आगामी सत्याग्रह या सिनेमाची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या सिनेमात करीना कपूर राजकारणी स्त्री पुढाऱ्याच्या भूमिकेत दिसू शकते.बॉलिवूडमध्ये करीना कपूर आता राजकीय महिलेची भूमिका करणार असल्याची चर्चा होती. मात्र खुद्द सिनेमाच्या दिग्दर्शकांनी याबद्दल एकही शब्द बोलला न्वहता. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करीनाच्याच नावावर निश्चिती होण्याची शक्यता आहे.
प्रकाश झा म्हणाले की, येत्या 10 दिवसांत आम्ही यासंदर्भात घोषणा करू. या सिनेमातून करीना कपूर पहिल्यांदाच झा यांच्यासोबत काम करेल. असं झालं तर `ओमकारा`नंतर अजय देवगण- करीना कपूर ओमकारानंतर दुसऱ्यांदा राजकारणावरील उत्कट भूमिकांमधून एकमेकांसमोर उभे ठाकतील.
‘सत्याग्रह’ हा सिनेमा अण्णा हजारेंच्या आंदोलनावर आधारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्याप्रमाणे यापूर्वी प्रकाश झा यांच्याच राजनीती सिनेमात कतरिनाने राजकारणी स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली होती, तसंच यावेळई करीना कपूर साकारणार आहे. अजय देवगणनेच करीनाच्या नावाचा आग्रह धरला होता. या सिनेमात अमिताभ बच्चनही आहेत.