www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता जॉन अब्राहम हा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याआधी जॉनचे अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले होते. बिपाशा बसू हिच्याबरोबर डेटिंग सुरू होते. मात्र, जॉनने प्रिया रूंचल हिच्याशी विवाह केला आहे.
जॉन अब्राहमने आपल्या चाहत्यांना २०१४ची गुड न्यूज दिली आहे. त्याने गुपचूप लग्न केलंय. जॉनने आपली मैत्रिण प्रिया हिच्याबरोबर सातफेरे घेतले. जॉनने ट्विटरवर चाहत्याचे आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्यांचे आभार मानले आहे. त्यांने सर्वांचे आभार व्यक्त करताना २०१४ सालाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याने शुभेच्छा देताना जॉन आणि प्रिया इब्राहीम असे नाव वापरले आहे. यावरून जॉनने विवाह केल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रिया ही चित्रपट क्षेत्रातील नसून ती बॅंकमध्ये काम करणारी मुलगी आहे. तिची आणि जॉनची भेट त्यांच्या मित्रांमुळे झाली. भेटीचे रूपांतर मैत्रीतनंतर प्रेमात आता जीवनसाथीत झाले आहे.
प्रियाबरोबर जॉन २०१० मध्ये पहिली ओळख झाली. त्याआधी बिपाशा बसूबरोबर जॉनचे नाव जोडले जात होते. २०११मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर प्रिया रूंचल हिच्याबरोबर प्रेम फुलले आणि त्यांनी कोणताही गाजावाजा न करता लग्न केले.
त्याने काय केलं होतं ट्विट
"Wishing you and your loved ones a blessed 2014! May this year bring you love, good fortune and joy. Love, John and Priya Abraham".
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.