फिल्म रिव्ह्यू : गुंडे - लव्ह आणि अॅक्शनचा कॉकटेल

व्हॅलेंटाईन डेला रिलीज होणाऱ्या चित्रपटाच नाव `गुंडे` असावं?... ऐकायला थोडसं विचित्र वाटणारं हे कॉम्बिनेशन... पण, हा सिनेमा लव्ह स्टोरी आणि अॅक्शनचं कॉकटेल आहे. त्यामुळे प्रदर्शनासाठी `व्हॅलेंटाईन डे` निवडला ते योग्यच म्हणावं लागेल. एका प्रेम तिकोणावर आधारलेला हा `गुंडे`... म्हणजेच अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांची कथा... प्रियांका चोप्राभोवती गुंफलेलं हे लव्ह ट्रँगल...

Updated: Feb 14, 2014, 04:38 PM IST

चित्रपट : गुंडे
दिग्दर्शक : अली अब्बास जफर
कलाकार : रणवीर सिंग, अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा,
वेळ : १५३ मिनिटं

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
व्हॅलेंटाईन डेला रिलीज होणाऱ्या चित्रपटाच नाव `गुंडे` असावं?... ऐकायला थोडसं विचित्र वाटणारं हे कॉम्बिनेशन... पण, हा सिनेमा लव्ह स्टोरी आणि अॅक्शनचं कॉकटेल आहे. त्यामुळे प्रदर्शनासाठी `व्हॅलेंटाईन डे` निवडला ते योग्यच म्हणावं लागेल. एका प्रेम तिकोणावर आधारलेला हा `गुंडे`... म्हणजेच अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांची कथा... प्रियांका चोप्राभोवती गुंफलेलं हे लव्ह ट्रँगल...
प्रेमाची कहाणी
अली अब्बास यांनी फिल्म प्रमोशनसाठी अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह यांना दिलवाले टि-शर्ट दिले होते. या `रेड हार्ट` टी-शर्टद्वारे हेच दाखवण्याचा प्रयत्न केला होता की आपल्या चित्रपटातील प्रेमात पडलेत... दोघंही आपल्या डोक्यापेक्षा हृद्यानं जास्त विचार करतात. सिनेमात दोन्ही गुंडे आणि त्यांच्या प्रेममयी हृदयाची कहाणी चित्रीत करण्यात आलीय.
काय आहे कथानक
हा चित्रपट दोन मुलांची कहाणी आहे... ज्यांना परिस्थितीमुळे गुंड बनावं लागतं. भारत आणि बांग्लादेश यांच्या विभाजनादरम्यान काही विस्थापित भारतात येतात. चित्रपटाची कथा १९७१मध्ये घडते, त्या काळात चालत्या ट्रेनमधून कोळसा चोरण्याचे प्रयत्न सर्रास होत असत. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी जगण्यासाठी धडपडणारे, विस्थापित झालेले बाला आणि विक्रम मोठे होऊन शहरातील नामी गुंड होतात. ते कधी मोठे गुंड झाले हे त्यांनाही कळत नाही. जेव्हा त्यांच्या गुन्ह्यांविषयी सरकारकडे कोणताही पुरावा नाही तिथंच मिळतं कथानकाला पहिल वळण...
...दरम्यान चित्रपटाच्या काहाणीने वेग पकडलेला असतो. बाला आणि विक्रमच्या आयुष्यात कॅब्रे डान्सर नंदिता म्हणजेच प्रियंका चोप्राची एन्ट्री झालेली असते. दोघेही नंदिताच्या प्रेमात पडलेले असतात. शेवटी इरफान खानला सिस्टीमकडून या दोन गुंड्याना पुराव्यानिशी पकडण्यासाठी पाठवण्यात येते. आणि त्यानंतर....!
कलाकार आणि त्यांचा अभिनय
अभिनयामध्ये रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर आपल्या भूमिका चोखपणे वठवितात. दोघांच्या अॅश्कनपॅक भूमिका जबरदस्त आहेत. टायमिंगसुद्धा चांगल आहे. प्रियांकाने कॅब्रे डान्सर नंदिताच्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय. इरफान खान एसीपीच्या भूमिकेत भाव खाऊन जातो. एकंदरीतच `गुंडे` हा डोक्याला जास्त त्रास न घेता तुम्ही पाहू शकता. रणवीर सिंह, प्रियाका चोप्राच्या फॅन्सना हा चित्रपट नक्की आवडेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.