पाहा `फग्ली` चित्रपटाचा प्रोमो

`फग्ली` हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Updated: Apr 8, 2014, 01:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया
`फग्ली` हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
भारताला ऑलेम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा विजेन्द्र सिंग, सोनम आणि अर्जुन कपूरचा भाऊ मोहित मारवा ही तरुणांची फौज या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.
वेगवेगळी जीवनशैली जगत असलेल्या विरेन्द्र सिंग, मोहित मारवा, अरफी लांबा आणि कायरा अडवाणी या चार मित्रांची ही कथा असून, जिमी शेरगील एका हरियाणवी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा विनोदी बाजाचा थरारक चित्रपट असल्याचे जाणवते.
एक साधी घटना चुकीचे वळण घेऊन खंडणी, खून आणि घाणेरड्या राजकारणात परावर्तित होते. याआधी `बुलेट राजा` चित्रपटात `यूपी का भैया` व्यक्तिरेखेत दिसलेला जिमी शेरगील या चित्रपटात हरयाणवी पोलिसाची व्यक्तिरेखा साकारत आहे, जो आपला खेळ चांगल्या प्रकारे जाणतो.
चित्रपटात जिमी शेरगील साकारत असलेली हरयाणवी पोलिसाची भूमिका ट्रेरलरमध्येदेखील उठून दिसते, जी निश्चितच ट्रेलरची खास बाब ठरते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर सदानंद याचे आहे. टायगर श्रॉफच्या `हिरोपंती` चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे प्रथम १६ मेला प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट आता १३ जूनला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे संगीत वेगळ्या धाटणीचे असल्याचं सांगण्यात येतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.