www.24taas.com, मुंबई
`विश्वरूपम` सिनेमावरून चालू असलेल्या वादावर आज अभिनेते कमल हासन यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कमल हासनने आपली बाजू मांडत अभिव्क्तीस्वातंत्र्याचा लढा चालूच ठेवणार असल्याचं सांगितलं.
मुंबईमध्ये आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कमल हासन यांनी आपल्या विश्वरूपम या सिनेमावरून सुरू असलेल्या वादाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. "माझ्या सिनेमावर असेल्या बंदीमुळे मी दुखावलो गेलो आहे. विश्वरूपम सिनेमातून मी कुणाच्याही भावना दुखावलेल्या नाहीत. त्यामुळे मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. या लढाईत मला समर्थन देणाऱ्या हजारो समर्थकांचे मी आभार मानतो," असं कमल हासन यावेळी म्हणाले.
या लढाईत आपल्याला मुस्लिम बांधवांचाही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचं कमल हासन यावेळी म्हणालो. तसंच सिनेसृष्टीतील जावेद अख्तर, सलमान खान, मधुर भांडारकर इत्यादी समर्थकांचेही कमल हासन यांनी आभार मानले. याचबरोबर आपण देश सोडण्याची केलेली भाषा हा त्यावेळचा माझा उद्वेग होता, असं कमल हासन यांनी स्पष्ट केलं.