मुंबई : अभिनेत्री दीपिका पदूकोन सध्या हॉलिवूडमध्ये दिसत असली तरी तिचं मुंबई प्रेम काही सुटणार नाहीय... याचं कारण म्हणजे, नुकताच दीपिकानं मुंबईत आणखी एक फ्लॅट खरेदी केलाय.
अभिनेत्री दीपिका पदूकोन बॅालिवूडबरोबर हॅालिवूडमध्येही झळकतेय. लवकर तिचा 'xxx - the return of xander cage' नावाची हॅालीव़ूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॅालिवूडमधल्या महागड्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते.
नुकताच, दीपिकानं 40 कोटींचा अलिशान फ्लॅट खरेदी केलाय. 2010 साली तिने मुंबईतील सर्वात पॅाश ठिकाणी एक घर खरेदी केलं होतं, त्याच ठिकाणी 30 व्या मजल्यावर आणखी एक अलिशान फ्लॅट दीपिकानं आता खरेदी केलाय. या फ्लॅटचा नंबर 3001 आहे.
आश्चर्याची गोष्ट ही आहे की, दीपीकाने हा फ्लॅाट स्वत:साठी नाही तर आपल्या एका खास व्यक्तीसाठी विकत घेतलाय. तुम्ही विचार करत असाल की, हा फ्लॅट दीपिकानं बॉयफ्रेंड रणवीर सिंगसाठी खरेदी केलाय की काय? पण तसं नाही... दीपिकानं हा फ्लॅट तिचे वडील प्रकाश पदूकोन यांच्यासाठी विकत घेतलाय.
प्रकाश पदूकोन यांना हा फ्लॅट अतिशय आवडला होता कारण त्यामध्ये बॅडमिंटन कोर्टसोबत सुंदर हिरवळ आहे. वडिलांची आवड लक्षात घेऊन दीपिकाने लगेच तो फ्लॅट खरेदी करून आता तो गिफ्ट करणार आहे.
दीपिका सध्या तिच्या पुढील सिनेमा ‘पद्मावती' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमा ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असणार आहेत.