www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सिनेनिर्माता संजय लीला भन्साळी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट ‘बाजीराव मस्तानी’साठी तयार आहे... आपल्या या आगामी प्रोजेक्टसाठी हात आखडता न घेता ‘दिल खोलके’ खर्च करायला तो मागेपुढे पाहत नाहीए... मिळालेल्या माहितीनुसार, याच सिनेमात दीपिकाला कास्ट करण्यासाठी त्यानं तब्बल 8 करोड रुपये मोजलेत.
म्हणजेच, दीपिका सध्याची बॉलिवूडमधली सगळ्यात जास्त कमाई करणारी अभिनेत्री ठरलीय. संजयच्या याच ‘बाजीराव मस्तानी’साठी दीपिकानं करण जोहरच्या ‘शुद्धी’साठी नकार दिला होता.
या सिनेमात दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंह ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. सोबतच प्रियांका चोप्राही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या तिघांची जोडी संजयच्या ‘राम-लीला’ या सिनेमातही एकत्र दिसली होती.
जवळजवळ 14 वर्षांच्या वनवासानंतर संजयला आपलं स्वप्न ‘बाजीराव मस्तानी’च्या माध्यमातून पूर्ण होत असल्याची खात्री पटलीय. हा सिनेमा पेशवा बाजीराव आणि त्यांची प्रेयसी मस्तानी यांच्या प्रेमकथेवर आधारीत आहे.
`जीराव मस्तानी`चा प्रवास...
एकेकाळी सलमान खान आणि ऐश्वर्या राय हाच सिनेमा करणार होते. परंतु, त्यांच्या ब्रेकअपनंतर संजयनं ऐश्वर्याच्या जागी करीना कपूरची निवड या सिनेमासाठी केली होती. यासाठी संजयनं करीना कपूरला सिनेमा पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याची अट घातली होती. मग, करीनानंही या सिनेमाला लाथाडलं. त्यानंतर, संजय अभिषेक आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांना घेऊन हा सिनेमा पूर्ण करण्याच्या तयारीत आहे, अशीही चर्चा सुरू होती. पण, सरते शेवटी संजयनं दीपिका, रणवीर आणि प्रियांका यांच्यासहीत शूटींग फ्लोअरवर उतरलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.