`चेन्नई एक्सप्रेस`चा पहिला दिवस : कमाई ३३.१० कोटी

ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळाला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 11, 2013, 03:16 PM IST

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या या सिनेमानं पहिल्याच दिवशी ३३.१० करोड रुपयांची कमाई करून भल्याभल्या सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केलेत. गेल्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘एक था टायगर’ या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई होती ३२.९२ करोड...
शाहरुख-दीपिकाच्या चेन्नई एक्सप्रेसनं आत्तापर्यंत ३९.८५ करोड रुपयांचा बिझनेस केलाय. बॉलिवूडच्या इतिहासात हा एक आगळावेगळा विक्रम समजला जात आहे. मुंबईसह दिल्ली, कोलकाता, बंगळुरू या मेट्रो सिटीसह देशभरातल्या प्रमुख शहरांमध्ये चेन्नई एक्स्प्रेस मोठ्या दिमाखात दाखल झालाय. गुरूवारी चेन्नई एक्स्प्रेसचे ‘पेड प्रिव्ह्यू शो’ ठेवण्यात आले होते. त्याला किंग खानच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद देत सिनेमावर उड्या टाकल्या. याआधी आमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या २००९ मध्ये पडद्यावर आलेल्या सिनेमानं ‘पेड प्रिव्ह्यू शो’च्या माध्यमातून २.७ करोडचा बिझनेस केला होता. तर शाहरुखच्या चेन्नई एक्स्प्रेसने प्रिव्ह्यू शोच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर विक्रमी ओपनिंग केलंय. केवळ पेड प्रिव्ह्यूमधून या सिनेमानं प्रदर्शनाआधीच ६.७५ करोड रुपयांची कमाई करून रेकॉर्डब्रेक कामगिरी केलीय.

विश्लेषकांच्या मते कमाईचे आत्तापर्यंतचे सारे रेकॉर्ड हा सिनेमा तोडू शकतो. मंदावलेली अर्थव्यवस्था, जीडीपी विकास दरात घसरण, रुपयाची घसरण अशा परिस्थिती घरच्या बॉक्स ऑफिससोबतच हा सिनेमा परदेशांतही चांगलीच कमाई करण्याची चिन्ह आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.