बिपाशाचे सिनेमा चालेना, बोल्ड फोटशूट मात्र फॉर्मात

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री असलेली बिपाशा बासूचा भाव चांगलाच खाली आला आहे. तिचे सिनेमेही धड चालेनासे झाले आहेत.

Updated: Dec 4, 2012, 04:57 PM IST

www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री असलेली बिपाशा बासूचा भाव चांगलाच खाली आला आहे. तिचे सिनेमेही धड चालेनासे झाले आहेत. त्यामुळे आता बिपाशा करतेय तरी काय असाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण बिपाशा सध्या व्यस्त आहे ती, तिच्या बोल्ड फोटोशूटमध्ये.. बिपाशा एका मॅगझीनसाठी बोल्ड फोटोशूट केल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
मागील काही दिवसांत रिलीज झालेले बिपाशाचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नाहीत. सप्टेंबरमध्ये रिलीज झालेला `राज 3` हा सिनेमासुद्धा फ्लॉप ठरला. करिअरच्या सुरुवातीच्य काळात बिपाशानेसुद्धा बोल्ड फोटोशूट केले आहे. 2001 साली तिने `अजनबी` या सिनेमाद्वारे करिअरला सुरुवात केली.
याशिवाय बिपाशा अनेक म्युझिक अल्बममध्येही झळकली आहे. शिवाय अनेक मॅगझिनसाठी तिने बोल्ड फोटोशूटसुद्धा केले आहे. आत्मा` हा बिपाशाचा आगामी सिनेमा आहे.