‘भाग मिल्खा भाग’ टॅक्स फ्री कराः फरहान

भाग मिल्खा भाग सिनेमा टॅक्सफ्री करावा अशी मागणी निर्माता-अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश मेहरा यांनी केलीये.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 17, 2013, 09:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाग मिल्खा भाग सिनेमा टॅक्सफ्री करावा अशी मागणी निर्माता-अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश मेहरा यांनी केलीये.
भाजप नेत्यांच्या मस्यस्थीनं या दोघांनी आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची भेट घेत सिनेमा करमुक्त करण्याची मागणी केली. त्यांच्यासोबत भाजप नेते विनोद तावडे, शायना एनसी आदी उपस्थित होते. आपल्या या मागणीला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल, अशी आशा फरहाननं व्यक्त केलीये.
धावपटू मिल्खा सिंह याने ऑल्मिपिक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे या क्रीडापटूचा जीवनपट नव्या पिढीला समजला पाहिजे, त्यासाठी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, असे अख्तर यांनी महसूलमंत्री थोरात यांना सांगितले.
समाजासाठी उपयुक्त ठरणारे किंवा चांगला संदेश देणारे चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबतचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यासाठी संबंधित एक समिती आहे, त्यापुढे हा चित्रपट पाठविण्यात येईल, असे थोरात यांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.