www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आलिया भट्टचा हायवे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणताही प्रभाव टाकण्यात अयशस्वी ठरली. परंतु, तिच्या कामामुळे तिची प्रशंसा करण्यात आली. आता तिची टू स्टेट्स हा चित्रपट येतो आहे. साऊथ इंडियन गर्ल बनलेल्या आलियाला पंजाबी मुलाशी प्रेम होते.
चित्रपटात अनन्या स्वामिनाथन या भूमिकेत आलिया दिसणार आहे. या रॉमँटिक चित्रपटात २० वर्षीय आलियाने अत्यंत बोल्ड सीन दिले आहे. या चित्रपटातून दिलेल्या हॉट सीनमुळे आपल्याला बोल्ड सीन करण्यात कोणताही विरोध नसल्याचे तिने दाखवून दिले आहे.
‘टू स्टेट्स’ या चित्रपटात अर्जुन कपूरसह जबरदस्त बोल्ड सीन दिले आहेत. चित्रपटात बेडरूम आणि बाथरूम सीनसह स्मुचिंग आणि लीप लॉक सीनपण आहेत. आलियाने आपल्या पहिला चित्रपट स्टुडंट ऑफ दी इअरमध्ये एक किसिंग सीन दिला होता. आता आलियाने आपल्या सिनिअर्सला तगडे आव्हान देण्याची तयारी केली आहे.
पाहा लीप लॉक आणि किसिंग सीन
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.