बिग बी झाले मंत्रमुग्ध, तीन वेळा पाहिला ‘राम-लीला’

बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन हे संजय लीला भंसाळीचा सिनेमा ‘गोलियों की रासलीला:राम-लीला’ मधील कलाकारांच्या अभिनयानं मंत्रमुग्ध झाले आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 19, 2013, 04:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन हे संजय लीला भंसाळीचा सिनेमा ‘गोलियों की रासलीला:राम-लीला’ मधील कलाकारांच्या अभिनयानं मंत्रमुग्ध झाले आहेत.
बिग बींनी सिनेमा पाहिल्यानंतर दिग्दर्शक भंसाळी आणि मुख्य भूमिका सादर करणारे कलाकार दीपिका पादुकोण आणि रणबीर सिंह यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांच्या कामासाठी त्यांचं कौतुकही केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. ही माहिती अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरुन दिली.
बिग बींनी ब्लॉगवर लिहिलं, ‘दुसऱ्यांच्या कौशल्याचं कौतुक केल्यानं, मनाला प्रसन्नता मिळते. रामलीला आणि त्यातील कलाकारांसाठी, मी आज असं केलं.. संजय लीला भंसाळी, दीपिका आणि रणबीरसह सुप्रिया आणि रिचा या कलाकारांमुळं हा सिनेमा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव ठरला आहे.’ अमिताभ बच्चन यांनी हा सिनेमा गेल्या २४ तासांमध्ये, ३ वेळा पाहिला आणि पुन्हा हा सिनेमा पाहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भंसाळी सोबत ‘ब्लॅक’ सिनेमात काम केलेल्या अमिताभ यांनी सांगितलं, की नवीन पिढीतील कलाकारांच्या अभिनयानं मी आनंदी आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.