अभिनेत्री काजोलच्या घरी चोरी, सोन्याच्या १७ बांगड्या लंपास

अभिनेत्री काजोलच्या मुंबईतील घरी चोरीची घटना घडली. २२ ऑक्टोबरला करवा चौथ पुजेच्या वेळी पाच लाख रुपयांच्या सोन्याची चोरी झाली. १७ सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार काजोलनं जुहू पोलिसांत केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 25, 2013, 12:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मंबई
अभिनेत्री काजोलच्या मुंबईतील घरी चोरीची घटना घडली. २२ ऑक्टोबरला करवा चौथ पुजेच्या वेळी पाच लाख रुपयांच्या सोन्याची चोरी झाली. १७ सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार काजोलनं जुहू पोलिसांत केली.
करवाचौथ निमित्त दागिने घालण्यासाठी काजोल गेली असता हा प्रकार उघड झाला. अशा पद्धतीनं याआधीही काजोलच्या घरातून दागिन्यांची आणि वस्तूंची चोरी झालीये असं काजोलनं आपल्या तक्रीरीत म्हटलं आहे. पोलिसांनी काजोलच्या या तक्रारीची दखल घेत तपास सुरु केला आहे.
२२ ऑक्टोबरला करवा चौथची पुजा होती. यावेळी चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जुहू पोलीस ठाण्यात १७ सोन्याच्या बांगड्यांची चोरी झाल्याची तक्रार देवगण कुटुबियांनी दिली आहे. घरातील नोकरवर्गावर संशय व्यक्त केला जात आहे. ही चोरी वॉर्डरोब तोडून केली गेल्याचे सांगितले जात आहे. यातील काही बांगड्या या अजय देवगणनं पत्नी काजोलला भेट दिल्या होत्या.
पोलिसांनी तपास सुरु केला असून घरातील काही जणांची चौकशी केली. दरम्यान यापूर्वीही २००८ मध्ये काजोलच्या घरी चोरी झाली होती. तिच्या घरी घरकाम करणा-या एका व्यक्तीला छत्तीसगडमधून अटक करण्यात आली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ