ऑस्कर गोज टू... ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव्ह

'ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव्ह' या चित्रपटानं बाजी मारलीय... तर 'ग्रॅव्हिटी' या सिनेमानं तब्बल पाच ऑस्कर पटकावत या सोहळ्यात आपला ठसा उमटवलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 3, 2014, 03:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
८६ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा दिमाखदारपणे पार पडला. 'ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव्ह' हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला 'ग्रॅव्हिटी'च्या अल्फान्सो क्लारोनने... 'ब्ल्यू जॅस्मिन'मधल्या भूमिकेसाठी 'केट ब्लॅन्चेट'ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला..मॅथ्यू मकाँनेने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर बाजी मारली. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता 'डलास बायर्स क्लब'मधील जॅरेट लेटो तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री 'ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव्ह'मधील ल्यूपिता नियांगो यांनी पटकवला.
'ग्रॅव्हिटी' या सिनेमानं तब्बल पाच ऑस्कर पटकावत या सोहळ्यात आपला ठसा उमटवलाय.
ऑस्कर विजेते : अॅन्ड द अॅवॉर्ड गोज टू...
* सर्वोत्कृष्ट चित्रपट : ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव्ह
* सर्वोत्कृष्ट दिग्दशर्न - अल्फान्सो कुरॉन (ग्रॅव्हिटी)
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिकेत) - केट ब्लान्चेट (ब्लू जॅस्मिन)
* सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिकेत) - मॅथ्यू मॅककोनोगे (डलास बायर्स क्लब)
* सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर : स्टिव्हन प्राईस (ग्रॅव्हिटी)
* सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग : लेट इट गो (फ्रोझन)
* सर्वोत्कृष्ट अॅडॉप्टेड स्क्रिनप्ले - ट्वेल्व्ह इअर अ स्लेव्ह (जॉन रिडले)
* सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रिनप्ले - हर (स्पाईक जोन्झ)
* सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी : एम्युनल लुबेझकी (ग्रॅव्हिटी)
* सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटींग - अल्फान्सो क्युरॉन, मार्क संगर (ग्रॅव्हिटी)
* सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - कॅथरिन मार्टीन, बेव्हर्लि ड्यून (द ग्रेट गॅट्सबाय)
* सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - ल्युपिटा नयांग ओ (टेल्व्ह इअर्स अ स्लेव्हया चित्रपटासाठी)
* सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटींग : ग्लेन फ्रीमॅन्टल (ग्रॅव्हिटी या चित्रपटासाठी)
* सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण : ग्रॅव्हिटी
* सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - जॅरेट लेटोला (डलास बायर्स क्लब या चित्रपटासाठी)
* सर्वोत्कृष्ट रंगभूषा - बायर्स क्लब
* सर्वोत्कृष्ट वेशभूषा - द ग्रेट गॅसबे
* व्हिज्युअल इफेक्टस - ग्रॅव्हिटी
* सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा - द ग्रेट ब्युटी
* सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी - ट्वेन्टी फीट फ्रॉम स्टारडम
* सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंटरी - द लेडी इन नंबर सिक्स : म्युझिक सेव्हड माय लाईफ
* सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - हेलियम
* सर्वोत्कृष्ट अॅनिमेटड - फ्रोझन
* सर्वोत्कृष्ट अॅनिमेटड शॉर्ट फिल्म - मि. हुबोल्ट
* सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशभूषा - अद्रीथा ली, रॉबिन मॅथ्यु (डलास बायर्स क्लब)

 
ऑस्करसाठी या सिनेमांमध्ये शर्यत
यामध्ये अमेरिकन हसल, द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, ग्रॅव्हिटी, हर, ट्वेल्व्ह इयर्स ए स्लेव, नेब्रास्का, फिलोमिनो, कॅप्टन फिलीप्स आणि डलास बायर्स क्लब या एकापेक्षा एक सरस चित्रपटांचा समावेश आहे. तर यंदाच्या बेस्ट डिरेक्टर कॅटेगरीमध्ये डेव्हिड ओ रसेल (अमेरिकन हसल), अल्फॉन्सो क्लारोन (ग्रॅव्हिटी), अलेक्झांडर पेन (नेब्रास्का), स्टीव्ह मॅक्विन (ट्वेल्ह इयर्स अ स्लेव्ह), द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट (मार्टिन स्कॉर्रोस्कीस) अशा दिग्गज दिग्दर्शकांचा समावेश आहे.
बेस्ट ऍक्टर कॅटेगरीमध्ये ख्रिश्चन बेल (अमेरिकन हसल), लिओनार्दो दी कॅप्रिओ (द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट), च्युएटल इजिओफोर (ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह), मॅथ्यू मकाँने (डलास बायर्स क्लब) आणि ब्रूस डर्न (नेब्रास्का) या अभिनेत्यांचा समावेश आहे. लिओनार्दो आपलं पहिलं ऑस्कर मिळवण्यासाठी नक्कीच शर्यतीत आहे.
तर बेस्ट ऍक्ट्रेस कॅटेगरीमध्ये एमी ऍडम्स (अमेरिकन हसल), सँड्रा बुलक (ग्रॅव्हिटी), मेरिल स्ट्रीप (ऑगस्ट- ओसेज काऊंटी), ज्युडी डेंच (फिलोमिनो) तर केट ब्लँचेट (ब्ल्यू जॅस्मिन) अशा श्रेष्ठ अभिनेत्रींचा समावेश आहे. यंदा सगळ्याच कॅटेगरीत तगडी टक्कर पाहायला मिळणार अशी अपेक्षा आहे