आमिर खान ‘इन्स्टाग्राम’वर झाला अॅक्टिव्ह!

फोटो शेअर करण्यासाठी वापरली जाणारी वेबसाईट ‘इन्स्टाग्राम’वर आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानही सामील झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 29, 2014, 06:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फोटो शेअर करण्यासाठी वापरली जाणारी वेबसाईट ‘इन्स्टाग्राम’वर आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानही सामील झालाय.
आमिरनं नुकतेच ‘इन्स्टाग्राम’वर दोन फोटो टाकलेत. पहिल्या फोटोत आमिर खान आपल्या फिल्ममेकर पत्नी किरण रावसोबत दिसतोय. या फोटोसहीत त्यानं ‘माझी पत्नी... माझं जीवन... माझं सगळं काही...’ असं म्हटलंय. तर दुसऱ्या एका फोटोत तो काही मुलांच्या घोळक्यात उभा आहे.
आमिर खान फेसबुक आणि ट्विटरवरही दिसतो. पण, तो म्हणतो ‘ट्विटरसाठी माझ्याकडे फारसा वेळ नाही... केवळ छोट्या दोन बॉक्समध्ये आपले फोटो टाकण्याचा वेळ आहे... जे माझ्या नियमित दिवसांना दाखवतात... गुड मॉर्निंग’
इन्स्टाग्रामवर सोनम कपूर, बिपाशा बासू यांशिवाय अनेक सेलिब्रिटी अगोदरपासूनच अॅक्टिव्ह आहेत... त्यात आता आमिर खानचंही नाव सामिल झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.