आलियाचं ‘गॅटमॅट’ अर्जुन कपूरसोबत?

बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या प्रेमसंबंधांच्या अफवेमुळे सध्या ती जोरदार चर्चेत आहे. गेल्या काही दिवसात आलियाचं नाव वरूण धवन आणि अर्जुन कपूरसोबत जोडण्यात आले आहे. याविषयी बोलतांना आलिया म्हणाली की, “मी अशा अफवांकडे लक्ष देत नाही.”

Updated: Aug 7, 2013, 06:35 PM IST

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या प्रेमसंबंधांच्या अफवेमुळे सध्या ती जोरदार चर्चेत आहे. गेल्या काही दिवसात आलियाचं नाव वरूण धवन आणि अर्जुन कपूरसोबत जोडण्यात आले आहे. याविषयी बोलतांना आलिया म्हणाली की, “मी अशा अफवांकडे लक्ष देत नाही.”
२० वर्षीय आलिया बेफिकीर होऊन म्हणते की, “मी या गोष्टीकडे लक्ष देत नाही, मी तेव्हापासून या अफवा ऐकते जेव्हापासून मी माझ्या करियरला सुरूवात केली आहे.” तिच्या मते, तीच नाव वरूणबरोबर तेव्हापासून जोडले आहे जेव्हा ती वरूणला ओळखत पण नव्हती. त्यामुळे ती म्हणते की, “मी याविषयी प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. मी त्या गोष्टींचा विचार करत नाही ज्या वास्तवातच नाही आहेत.”
आलिया पत्रकारांशी संवाद साधतांना असं म्हणाली की, “जर असं काही असेल तर मी स्वतः सर्वांना नक्की सांगेल.” ती या नातेसंबंधी बोलतांना म्हणाली की, “मी या नात्यांची सुरूवात करतांना प्रथम हे बघेन की, मी त्याच्याबरोबर स्वतःला जोडू शकेल की नाही आणि ती व्यक्ती कोणत्याही व्यवसायातील असू शकते.”
आलिया भट्टने करण जोहरच्या ‘स्टुडेंट ऑफ द इयर’ या सिनेमात काम करून आपल्या करियरला सुरूवात केली आणि आता ती करण जोहारच्याच ‘टू स्टेट्स’ या सिनेमात अर्जुन कपूरबरोबर काम करणार आहे. आलिया करणच्या ‘इशकजादे’ या सिमेनात त्याने केलेल्या कामावर पूर्णपणे प्रभावित आहे. आलियाच हिंदीचे उच्चार हे खराब आहेत पण ते सुधारण्यासाठी अर्जुन तिला पूर्ण मदत करत आहे. असे ती सांगते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x