www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
61 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
नागराज मंजुळे या नव्या दमाच्या दिग्दर्शकाला उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला आहे.
'आजचा दिवस माझा' या चित्रपटाला त्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
'फॅण्ड्री'मधील भूमिकेसाठी सोमनाथ अवघडे याला उत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार देण्यात आला आहे. यलो या मराठी सिनेमाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा सन्मान जॉली एलएलबी या सिनेमाला देण्यात आला आहे. यात सौरभ शुक्ला यांना बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा बहुमान देण्यात आला आहे.
तुझा धर्म कोणता या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून बेला शेंडे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
अस्तू चित्रपटासाठी सुमित्रा भावे यांना उत्कृष्ट संवादाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार
१) उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक - गणेश आचार्य (भाग मिल्खा भाग)
२) सर्वश्रेष्ठ गायिका - बेला शेंडे (तुझा धर्म कोणचा)
३) उत्कृष्ट बालकलाकार - सोमनाथ अवघडे
४) स्पेशल ज्युरी अवॉर्ड - यलो
५) उत्कृष्ट संवाद - सुमित्रा भावे (अस्तू)
६) उत्कृष्ट हिंदी चित्रपट - जॉली एलएलबी
७) उत्कृष्ट मराठी चित्रपट - आजचा दिवस माझा
८) नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
९)सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयांवरील चित्रपट- तुझा धर्म कोणचा
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.