फिल्म रिव्ह्यू: निराशा करणारा `हमशकल्स`!

साजिद खान निर्माता-दिग्दर्शित विनोदी चित्रपट `हमशकल्स` शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रेषकांनी या फिल्मकडून खूप आशा-अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र साजिद त्या यावेळी पूर्ण करु शकला नाही आहे. या फिल्मला साजिदनं हाऊसफुलसारखा विनोदी तडका दिला नाही आहे.

Updated: Jun 20, 2014, 06:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
साजिद खान निर्माता-दिग्दर्शित विनोदी चित्रपट `हमशकल्स` शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रेषकांनी या फिल्मकडून खूप आशा-अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र साजिद त्या यावेळी पूर्ण करु शकला नाही आहे. या फिल्मला साजिदनं हाऊसफुलसारखा विनोदी तडका दिला नाही आहे.
फिल्ममध्ये मुख्य कलाकारांचा ट्रिपल रोल आहे. ज्यात कथा समजून घेण्यासाठी डोक्याला ताण द्यावा लागतो. तसंच कथा थोडी फार विनोदी असली तरी खूप गोंधळात टाकणारी आहे, त्यामुळं विनोदाची मजा कमी होत जाते.
पटकथा
फिल्ममध्ये मुख्य भूमिका सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर यांनी केली आहे. विशेष म्हणजे या तिघांनी फिल्ममध्ये तीन-तीन भूमिका केल्या आहेत. अशोक सिंघानिया (सैफ अली खान) लंडनचा खूप मोठा उद्योगपती आहे आणि त्याचे वडिल कोमामध्ये असतात. अशोक आणि कुमार ( रितेश देशमुख) दोघे खूप बालपणांपासूनचे मित्र आहेत. अशोकचा मामा (राम कपूर)ला त्यांची संपूर्ण संपत्ती हवी असते. त्यासाठी दोन अटी असतात की अशोक-कुमार वेडे तरी झाले पाहिजे नाहीतर कोमामध्ये गेले पाहिजेत. मामा कट रचून अशोक आणि कुमारला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहचवतो.
दुसरीकडे अशोक कुमारचे हमशकल्स त्याच वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या तुरुंगात बंद आहेत. ईशा गुप्ता त्याच वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. तिला समजते की, कोणी तरी अशोक -कुमारच्या विरोधात कट रचत आहे म्हणून ती अशोक-कुमारला वेड्यांच्या हॉस्पिटलमधून सोडून देते.
फिल्ममध्ये तमन्ना भाटिया एका टिव्ही चॅनेलची होस्ट बनली आहे. तिच ईशा गुप्ता आणि बिपाशा बासू उदयोगपती अशोकच्या सेक्रेटरीची भूमिका केली आहे. जे फिल्ममधल्या काही गाण्यात आणि रोमॉन्टिक सिन्समध्ये दिसते.
अभिनयाच्या बाबतीत बोललं तर रितेश देशमुख आपल्या विनोदांनी बाकी सगळ्या कलाकारांपेक्षा भारी आहे. रितेशने आता सिद्ध करुन दाखवले की अशा भूमिका करण्यात त्याला महारथ मिळालीय. अशाप्रकारचे रोल त्याने या आधीही केले आहेत. मात्र सैफ अली खान काहीवेळा ओव्हर अॅक्टिंग करताना दिसून आला. तशी राम कपूरने आपली भूमिका चांगल्या पद्धतीनं निभावली आहे. बिपाशा बासू, ईशा गुप्ता आणि तमन्ना भाटियाने फक्त ग्लॅमरचा तडका लागण्यासाठी फिल्ममध्ये आहेत. त्यांच्या वाट्याला जास्त काही आलं नाही.
फिल्मची कथा फक्त मनोरंजक असली तरी खूप गोंधळात टाकणारी आहे. तुम्हांला फक्त उलट-सुलट कॉमेडी बघायची असल्यास हमशक्कल ठीक आहे. `हाउसफुल` आणि `हाउसफुल-२`च्या आठवणी घरी सोडून फिल्म बघायला जावे, कारण त्यानं तुम्हाला निराशा होऊ शकते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.