शेतकऱ्यांना 'दिलवाल्यांची' नाही, 'दानतवाल्यांची' गरज

(जयवंत पाटील, झी २४ तास ) नोकरीसाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त गाव सोडून, परदेशात, मुंबई, पुण्यात नोकरीला आज शेतकऱ्यांची मुलं आहेत. कारण मागील तीन दशकापासून शेती संकटात आहे, म्हणून आपल्यावर स्थलांतराची वेळ आली आहे. अगदी पोलिसांपासून आयटी इंजिनीअर्सपर्यंत यात बहुतांश शेतकऱ्यांची मुलं आहेत.

Updated: Dec 16, 2015, 11:41 PM IST
शेतकऱ्यांना 'दिलवाल्यांची' नाही, 'दानतवाल्यांची' गरज title=

मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास ) नोकरीसाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त गाव सोडून, परदेशात, मुंबई, पुण्यात नोकरीला आज शेतकऱ्यांची मुलं आहेत. कारण मागील तीन दशकापासून शेती संकटात आहे, म्हणून आपल्यावर स्थलांतराची वेळ आली आहे. अगदी पोलिसांपासून आयटी इंजिनीअर्सपर्यंत यात बहुतांश शेतकऱ्यांची मुलं आहेत.

आपल्यांसाठी आपणच होऊ या #दानतवाले

हे सांगण्याचं कारण शहरातही शेतकऱ्यांची मूलं मोठ्या प्रमाणात आहेत. शहरांची अर्थव्यवस्थेचा आपण भाग आहोत, शहरात आपली पहिली पिढी असल्याने स्ट्रगलर्समध्ये शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. स्थंलातरीत शेतकऱ्यांच्या मुलांच्या पुढील पिढीला शेतकऱ्यांची जाण असेल किंवा नाही,  हे आताच काही सांगता येत नाही.

मात्र आताच पोटासाठी माय-बापाला सोडून आलेल्या, या पिढीला याची नक्कीच जाण आहे, यात दुष्काळाची भीषणता आणखी वाढणार असल्याने अधिकच चिंता आहे. 

मात्र कोणता तरी नट, ज्याला लोकं सेलिब्रिटी म्हणतात, त्याने चेन्नईच्या पूरग्रस्तांसाठी १ कोटी रूपये मदत दिली. पण त्याने राज्यातील दुष्काळग्रस्तांना एक रूपयांचीही मदत केली नाही, असा त्याच्यावर आरोप होतोय. यावर एका पक्षाने आपली सिनेमाविरोधात अधिकृत भूमिका नसल्याचं म्हटलं आहे.

कुणी दिले नाहीत, तर आपण १ कोटी जमवू या... #दानतवाले
बॉलीवूडच्या काही सेलिब्रिटींना संवेदना आहेत, थोडक्यात संवेदना व्यक्त करण्याची त्यांची दानत आहे, आपल्याला दानतवाल्यांची गरज आहे, दिलवाल्यांची नाही.

म्हणून आपण #दानतवाले होऊ या, यासाठी तीन गोष्टींची गरज आहे.

१) पहिली गरज, अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी चालवलेल्या 'नाम' संस्थेला काही दिवसातच १ कोटी रूपयांपर्यंतची मदत जमवू या, दाखवून देऊ या आपण #दानतवाले आहोत, यासाठी एकच करा आपली मदत 'नाम'ला या अकाऊंटवर पाठवू या.. NAAM FOUNDATION, SBI, CURRENT ACCOUNT NO - 35226127148, SBIN - 0006319

२) दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट पंधरा दिवस अनावश्यक खर्च टाळा,  यातून तुम्हाला नामला मदत पाठवता येईल.

३) तिसरी गोष्ट हा मेसेज व्हॉटस अॅप, फेसबुकवर तुमच्या तीन मित्रांना तरी पाठवा. सोशल मीडियावर शेअर करताना #दानतवाले या हॅशटॅग शेअर करा.