पृथ्वीवर ब्रम्हदेवाची एकाच ठिकाणी पूजा का होते?

ब्रम्हदेवाची पूजा एकाच ठिकाणी होते याबद्दल दोन पौराणिक कथा आहेत. त्या पैकी एक सरस्वती देवींची आहे आणि दुसरी शंकराची आहे. 

Updated: Feb 12, 2015, 10:31 PM IST
पृथ्वीवर ब्रम्हदेवाची एकाच ठिकाणी पूजा का होते?  title=

मुंबई : ब्रम्हदेवाची पूजा एकाच ठिकाणी होते याबद्दल दोन पौराणिक कथा आहेत. त्या पैकी एक सरस्वती देवींची आहे आणि दुसरी शंकराची आहे. 

१) सरस्वतीची पौराणिक कथा 
एकदा ब्रम्हदेवाने पवित्र उद्देशासाठी यज्ञ करायचे ठरविले. हा यज्ञ शुभ समयी करायचा होता. पण त्यावेळी पत्नी सरस्वती त्या ठिकाणी असणे आवश्यक होते. सरस्वतीने त्यांना वाट पाहण्यास लावले. 

पण ब्रम्हदेवाने गडबडीत गवळी असलेल्या गायत्रीशी विवाह केला आणि तिला यज्ञाच्या ठिकाणी बसविले. सरस्वती आपल्या ठिकाणी दुसऱ्या स्त्रीला पाहून क्रोधीत झाली. त्यांनी ब्रम्हदेवाला श्राप दिला पृथ्वीवर कोणी तुमची पूजा करणार नाही. पण इतर देवांच्या प्रार्थनेनंतर त्यांनी उपशाप दिला आणि फक्त पुष्कर या राजस्थान येथेच पूजा करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे ब्रम्हदेवाचे पृथ्वीवर एकमेव मंदिर पुष्करला आहे. 

2) शंकराची पौराणिक कथा
श्री शिवमहापुराणानुसार श्री शंकर देवाच्या शापामुळे ब्रम्हदेवाची पूजा होत नाही. त्याची गोष्ट अशी. 

एका वेळेस ब्रम्हा आणि विष्णूमध्ये युद्ध झाले. त्यावेळी सर्व देवता भगवान शंकराला मदतीसाठी प्रार्थना करू लागले. 

त्यावेळी ब्रम्हा आणि विष्णूंचे ध्यान दुसरीकडे लावण्याकरीता श्री भगवान शंकर तेथे स्तम्भ रुपात प्रकट झाले. त्यावेळी शंकराने 'भैरव' शक्ती प्रकट केली. त्यावेळी भैरवाने शंकराची आज्ञा घेऊन ब्रम्हाचे पाचवे डोके धडावेगळे केले. त्यावेळी शंकराने ब्रम्हास शाप दिला की तुझा पृथ्वीवर सत्कार, उत्सव, पूजा होणार नाही. त्यावेळी ब्रम्हाने श्री भगवान शंकराची क्षमा मागितली त्यावेळी शंकराने यज्ञ पूजन करण्याची प्रथा ठेवली 

तेव्हापासून पृथ्वीलोकात ब्रम्हाची पूजा करत नाही फक्त यज्ञ होतो.