जाणून घ्या २०१६ तील नॉस्ट्रॅडेमसच्या टॉप १० भविष्यवाणी

मुंबई : १६व्या शतकातील फ्रेंच तत्वज्ञानी ​​नेस्त्रेदमस हा जगातील भाकीत करण्यारा एक्सपर्ट मानला जातो.

Updated: Jan 14, 2016, 09:03 AM IST
जाणून घ्या २०१६ तील नॉस्ट्रॅडेमसच्या टॉप १० भविष्यवाणी  title=

मुंबई : १६व्या शतकातील फ्रेंच तत्वज्ञानी नॉस्ट्रॅडेमस हा जगातील भाकीत करण्यारा एक्सपर्ट मानला जातो. केनेडींची हत्या, हिटलरचा उदय, ९/११ चे हल्ले अशा अनेक प्रकरणांचं त्याने केलेलं भाकित खरं ठरलं आहे. आजच्या जगात अशी भविष्यवाणी करणारे फार कमी लोक आहेत. म्हणूनच २०१६ बद्दल काय नेस्त्रेदमस काय म्हणतो ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. 

१०. बराक ओबामा: 'महासत्ता' अमेरिकेचे शेवटचे अध्यक्ष  
नेस्त्रेदमसने म्हटल्याप्रमाणे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा २०१३ मध्ये निवडून आले. पण त्याच्या मतानुसार ओबामा हे महासत्ता अमेरिकेचे 'शेवटचे' अध्यक्ष असतील. म्हणजे २०१६ नंतर जगात कोणाचे वर्चस्व असेल? रशिया, चीन की अजून कोण?

९. हवामान बदल
नेस्त्रेदमस म्हणतो वातावरणात खूप बदल होतील. 'पाण्याची पातळी वाढून जमीन पाण्याखाली जाईल'. २०१५ मध्येही वातावरणात खूप बदल झाले. 

८. भौतिक बदल
नेस्त्रेदमस म्हणतो आकाशात ग्रह ताऱ्यांचे बदल होतील आणि त्याचे गंभीर परिणाम पृथ्वीवर होतील. म्हणजे त्सुनामी किंवा भूकंप येतील का? 

७. पश्चिम आशिया धगधगेल
२०१६ मध्ये तेल असलेली राष्ट्रे धगधगतील. २०१६ मध्ये अमेरिकेत निवडणुका आहेत. ह्या दोन घटनांचा आपापसात संबंध असेल काय?

६. पश्चिम आशियात स्फोट होतील
२०१५ साल पश्चिम आशियासाठी वाईट होते. काही विमानांचे अपघातही झाले. २०१६ मध्ये अनेक विमाने पडतील असे नेस्त्रेदमस म्हणतो. म्हणजे २०१६ मध्ये हेच सुरू राहण्याची शक्यता आहे. 

५. पृथ्वी नाश
नेस्त्रेदमस म्हणाला होता की ईराक युद्ध हे जगाच्या नाशाची सुरुवात असेल. पण माया संस्कृतीने केलेले किंवा इतरांनी केलेले पृथ्वी नाशाचे भाकीतही खरे ठरले नाही. तेव्हा हे खरे ठरेल काय? 

४.  व्हाइट हाऊसचा खेळ
व्हाइट हाऊस पृथ्वीवरील नाशाचे कारण असू शकते. पश्चिम आशियापासून हा नाश सुरू होईल. कोणत्या पश्चिम आशियाई देशांना अमेरीका 'बुद्धीबळाप्रमाणे' वागवेल; तिथे शांतता येणे कठीण होईल. इराक, अफगाणिस्तानात आज अशीच स्थिती आहे. 

३. पृथ्वीचे धृव वितळतील 
जागतिक तापमानवाढ हा आत्ताच महत्त्वाचा प्रश्न आहे. २०१६ पृथ्वीचे दोन्ही धृव वितळतील, असे नेस्त्रेदमस म्हणतो. यामुळे वातावरणात अचानक बदल येतील. 

२. इस्राईलवर संकट
नेस्त्रेदमस म्हणतो २०१६ मध्ये जेरुसलेम शहराला तीन बाजूंनी वेढा पडेल आणि त्यातून सुटण्यासाठी इस्राइलला अमेरीका मदत करेल. ही येणाऱ्या इस्राइल युद्धाची नांदी तर नाही ना?

१. शांतिदूत रशिया 
'उत्तरेकडील राजा जगात शांतता आणेल' असे भाकित नॉस्ट्रॅडेमस दर्शवतो. सर्व आंतरराष्ट्रीय प्रश्नांत सध्या पुतिनचा रशिया महत्त्वाची भूमिका बजावतोय. हा शांतिदूत पुतीनच असेल काय?