महत्त्वाची बातमी: आज वर्षातील शेवटची अंगारकी, पुढील वर्षी योग नाही!

गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी दर महिन्यात येते, पण अंगारकीचा योग क्वचितच येतो. आज अंगारकी चतुर्थी आहे पण ती वर्षातली शेवटीच... यानंतर एकदम २०१७ मध्ये अंगारकी चतुर्थीचा योग आहे. २०१६मध्ये एकही अंगारक योग नाही. 

Updated: Sep 1, 2015, 04:03 PM IST
महत्त्वाची बातमी: आज वर्षातील शेवटची अंगारकी, पुढील वर्षी योग नाही! title=

मुंबई: गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी दर महिन्यात येते, पण अंगारकीचा योग क्वचितच येतो. आज अंगारकी चतुर्थी आहे पण ती वर्षातली शेवटीच... यानंतर एकदम २०१७ मध्ये अंगारकी चतुर्थीचा योग आहे. २०१६मध्ये एकही अंगारक योग नाही. 

आणखी वाचा - जपमाळेत १०८ मणी का असतात?

आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासह राज्यातील इतर सर्व गणेश मंदिरांमध्ये आज भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. 

२०१७ मध्ये मात्र, १४ फेब्रुवारी, १३ जून आणि ७ नोव्हेंबर रोजी अशा तीन अंगारक संकष्ट चतुर्थी येणार असल्याचं पंचांगकर्ते आणि ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलंय. पुढच्या वर्षी अंगारक चतुर्थीचा एकही योग का नाही, याचं कुठलंही शास्त्रीय कारण नसल्याचं ते म्हणाले.

आणखी वाचा - पृथ्वीवर ब्रम्हदेवाची एकाच ठिकाणी पूजा का होते?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.