www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्या हस्तरेषा तुमचं भविष्य सांगतात असं म्हटलं जातं. पण, केवळ हस्तरेषा नाही तर तुमचा हातही तुमचं भविष्य ठरवतो. कारण, तुम्ही जेव्हा इतरांशी ‘हॅन्डशेक’साठी हात मिळवता त्यावेळी त्या व्यक्तीला तुमचा स्वभाव माहिती पडू शकतो. कोणत्याही नव्या व्यक्तीशी केवळ हात मिळवल्यानं आपल्यालाही समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आणि व्यवहारांचा अंदाज येऊ शकतो.
- जर एखाद्या व्यक्तीच्या हाताचा पंजा पातळ, कठोर आणि सुरकुतलेला असेल तर ती व्यक्ती अनेकदा चिंताग्रस्त किंवा घाबरलेली असते. अशी लोक अनेकदा आपली कामं पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतात.
- ज्या लोकांच्या हाताचा पंजा जाडा, जड आणि कोमल असतो अशी लोकं विलासी आणि कामूक असतात. अशी लोक आपलं जीवना साऱ्या सुख-सुविधांसह व्यतीत करतात.
- जर एखाद्याच्या हाताचा पंजा पातळ, कोमल असोल तर अशी लोक आळशी असतात. अशी लोक जास्त कामूक स्वभावाची असतात. आळसामुळे ते बऱ्याचदा स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतात.
- ज्या लोकांच्या हाताचा पंजा कठिम असतो अशी लोक जास्त मेहनती असतात. पंजा आणि बोटं समान असतील तर अशा व्यक्ती स्थिर मन, मेहनती आणि कोणतीही गोष्ट चटकन ध्यानात घेणाऱ्या असतात. सगळ्यांशी त्यांचं वर्तन समान असतं.
- पंजाच्या मध्यभागी खड्डा असेल तर अशा लोकांना भाग्यहीन समजलं जातं. अशा लोकांच्या समस्या सुटण्याचं नावच घेत नाहीत.
- जे लोक खूप विचार विनिमय करून काम करतात अशा लोकांचा हात साधारणत: मोठा असतो. कोणत्याही प्रकारचं काम अशी लोकं मोठ्या कुशलतेनं सांभाळतात आणि त्यांना यशही मिळतं.
- ज्या व्यक्तींचा पंजा सामान्यत: छोटा असतो अशा व्यक्ती आखलेल्या योजनाही योग्य पार पाडू शकत नाहीत. अशा लोकांची हॅन्डरायटींग सामान्यत: मोठ्या अक्षरांची असते.
- एखाद्या व्यक्तीच्या हाताचा पंजा आणि अंगठा लवचिक असतो असे लोक कोणत्याही कठिण परिस्थितीचा सामाना करताना मागे हटतात.
- ज्या लोकांचा अंगठा सुदृढ आणि कठोर असतो असे लोक दुसऱ्यांच्या वक्तव्यावर चटकन सहमत होत नाहीत. नेहमी सतर्क राहणारे हे लोक असतात. अनेकदा त्यांचा कोणावरच विश्वास बसत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.