मुंबई : शिवपूजनात अनेक प्रकारच्या मंत्राचा जप केला जातो आणि कार्य सिद्धीसाठी या मंत्रांची संख्याही वेगवेगळी असते. पण शिवशंभूंना त्यांचा एकमंत्र खूप प्रिय आहे.
महामृत्यूंजय मंत्र एक असा मंत्र आहे. ज्याचा जप केल्यानंतर मनुष्य मृत्यूवरही विजय प्राप्त करू शकतो. शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या कार्यांसाठी वेगवेगळ्या संख्येत मंत्राचा जप करण्याचे विधान आहे.
- भयातून मुक्तीसाठी या मंत्राचा ११०० वेळा जप केला पाहिजे.
- रोगाच्या मुक्तिसाठी या मंत्रांचा ११००० वेळा जप केला पाहिजे.
- पूत्र प्राप्तिसाठी, उन्नतीसाठी, अकाली मृत्यूपासून वाचण्यासाठी या मंत्राचा सव्वा लाख वेळा जप केला पाहिजे.
- साधक संपूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने याची साधना केल्यास वांछित फल प्राप्तीची शक्यता अधिक आहे.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥