मुंबई : असं म्हटलं जात की माणसाच नशीब त्याच्या हातावर लिहिलेलं असतं. मात्र कमी लोकांना हे माहित असेल की हातांच्या बोटांवरुन माणसाच्या व्यक्तिमत्वाची ओळख होत असते. खासकरुन महिलांची. मुलींच्या बोटांवरुन ओळखा त्यांचा स्वभाव
लांब आणि सडपातळ बोटे - ज्या मुलींची हाताची बोटे लांब आणि सडपातळ असतात अशा मुली क्रिएटिव्ह आणि सरळ स्वभावाच्या असतात. प्रेयसी, पत्नी, मैत्रीण प्रत्येक नात्यात या परफेक्ट असतात. अशी बोटे असलेल्या मुली सुंदर मानल्या जातात.
आखूड आणि जाड बोटे - अशा मुलींना स्वत:च्याच मर्जीने जगायला आवडते. मात्र कामाच्या प्रती या सिरियस नसतात.
जाड आणि फुगीर बोटे - काम आणि नात्याबाबत अशा मुली खूप गंभीर असतात.
लहान आणि बारीक बोटे - अशा मुली कंजूस आणि थोड्या रागीट असतात.
मध्यम आणि पातळ बोटे - अशा मुलींचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. तसेच या रोमँटिक असतात.