काय सांगतात तुमच्या कपाळाच्या रेषा?

कपाळाच्या रेषा ह्या नेहमी आपलं नशीब सांगतात असं बोललं जातं. वयाच्या १५ ते ३० वर्षापर्यंत या रेषा ठळक होतात. चला तर मग बघूयात काय नशीब घेऊन आल्यात या रेषा?

Updated: Apr 25, 2013, 02:31 PM IST

www.24taas.com
कपाळाच्या रेषा ह्या नेहमी आपलं नशीब सांगतात असं बोललं जातं. वयाच्या १५ ते ३० वर्षापर्यंत या रेषा ठळक होतात. चला तर मग बघूयात काय नशीब घेऊन आल्यात या रेषा?
कपाळावरच्या या रेषा एकूण सात प्रकारात विभागल्या आहेत. त्या सातही रेषा संगळ्यानाच असतात असं नाही. तुमचं व्यक्तिमत्वही याचं रेषांवरून पारखलं जाऊ शकतं.
रहस्यवादी रेषा
ही रेषा तुमच्या कपाळावर सर्वात उच्च स्थानी असते. काही मोजक्याच लोकांना ही रेष असते आणि ज्यांना असते त्यांना तुटक स्वरूपात असते. या रेषेचे असणं एक शुभ संकेत मानला जातो. ही रेषा तुमच्या विश्लेषणात्मक प्रकृतीचं दर्शन घडवते तर तुमच्या मनाचा वैज्ञानिक कलही जाणते. अशा व्यक्तींचा दृष्टीकोन खूप पारदर्शक असतो. अशा व्यक्ती आपलं उद्दिष्यट साध्या झाल्याशिवाय शांत बसणाऱ्या नसतात. सामाजिक बांधिलकी जपणे यांच्या नशिबातच नाही. ही रेष असणारी व्यक्ती जादूगार, शास्त्रज्ञ अथवा ज्योतिषशास्त्रज्ञ असते.
नशीब रेषा
ही रेषा कपाळावर दुसऱ्या स्थानांवर असते. ही रेषा असणारी व्यक्ती नेहमी सत्यवादी, सत्यवचनी असते आणि सतत सत्याचा शोध घेणारी असते.ती व्यक्ती निर्णय घेण्यात अग्रेसर, खूप समझूतदार आणि आत्मविश्वास प्रबळ असतो. प्राध्यापक, शिक्षक आणि सरकारी नोकरीत उच्च स्थानावर असणारी ही व्यक्ती रेषा तुटक असेल तर कमी संवेदनशील, मुर्ख असते.
धैर्य रेषा
बुद्धी रेषे खालील रेषा म्हणजे धैर्य रेषा. सरळ धैर्य रेषा एखाद्या कठीण प्रसंगाला तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळतात ते सांगते. ही रेषा असणारी व्यक्ती पोलीस किंवा अव्वल दर्जाचे खेळाडू असतात. पण हीच रेषा जर तुटक अथवा विखुरलेली असेल तर ती व्यक्ती गुन्हेगार, बलात्कारी असते.
बुद्धी रेषा
वरून चौथी रेषा म्हणजे बुद्भी रेषा. तुमची आकलन क्षमता जास्त असल्याचे ही रेषा सांगते. तुम्ही लोकांची मानसिकता चांगल्या प्रकारे जाणता. तर तुमच्या फायद्यासाठी इतरांना तुम्ही फसवूही शकता. ही रेषा असणारी व्यक्ती खूप बडबडी असते. ही रेषा असणारी व्यक्ती वकील, व्यावसायिक किंवा फरॅशन डिझाईनरही असू शकते.

प्रेमाची रेषा
पाचवी रेषा म्हणजे प्रेमाची रेषा. तुमचं प्रेम जीवन कसं असेल हे सांगणारी रेषा म्हणजे प्रेम रेषा. ही रेषा असणारी व्यक्ती खूप आकर्षक आणि सगळ्यांमध्ये उठून दिसणारं व्यक्तीमत्व असणारी असते.