ग्रहांचे खडे धारण केल्याने काय होतं?

विवाह होत नसेल तर `पुखराज`, मंगळ असेल तर पोवळा व तापट स्वभाव असेल तर मोती धारण करावा. पण कोणते रत्न कधी धारण करावे?

Updated: May 24, 2013, 08:16 AM IST

www.24taas.com
ग्रहांचा परिणाम हा नेहमीच मानवी मनावर होत असतो. त्यामुळे बऱ्याचदा ग्रहांचा आपल्यावर होणाऱ्या परिणांमासाठी ग्रहांचे खडे धारण केले जातात. मात्र ग्रहांचे खडे कशासाठी धारण करावे याबाबत संभ्रम असतो. आणि त्यामुळे त्यांचे काही परिणामही दिसून येतात. विवाह होत नसेल तर `पुखराज`, मंगळ असेल तर पोवळा व तापट स्वभाव असेल तर मोती धारण करावा. पण कोणते रत्न कधी धारण करावे, याचे ज्ञान आपल्याला नसते. त्यामुळे कितीही ग्रहांचे खडे धारण केले तरी त्याचा फायदा होत नाही. लग्न कुंडली, नवमाश, ग्रहांचे बलाबल, दशा-महादशा आदींचा अभ्यास करून रत्न धारण करण्‍याचा सल्ला दिला जातो. विनाकारण रत्न धारण केल्याने ते नुकसानदायकही ठरू शकते.
मोती निराशाही देऊ शकतो. पोवळा रक्तदाब वाढवू शकतो तर पुखराज अहंकार निर्माण करू शकतो. सामान्यत: लग्न कुंडलीनुसार लग्न, नवम, पंचम रत्न धारण केले जाऊ शकतात. जे ग्रह शुभ भावाचे स्वामी असून पापाचा प्रभाव कमी करणारे असतात. श‍त्रुची कार्यक्षमता कमी करण्यासाठी कुंडली पाहूनच रत्न धारण करणे प्रभावशाली होत असते.

रत्न किंवा खडे हे अंगठी किंवा लॉकेटमध्ये सोने, चांदी, तांबे अथवा पितळ अशा धातूंमध्ये धारण करावे. ग्रहासाठी शुभ असलेल्या दिवशी शुभ मुहुर्तावर रत्न धारण केले जाते. रत्न धारण करण्‍यापूर्वी कच्च्या दुधात दोन दिवस अगोदर टाकून ठेवावा.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.