www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्याला हव्या तशा पद्धतीनंच साऱ्या गोष्टी व्हायला हव्यात हा अट्टहास माणसाला कोणत्या दिशेनं घेऊन जाईल हे सांगता येत नाही. पण, काही वेळेला गोष्टी घडून याव्यात यासाठी प्रयत्न करणंही काही वाईट नाही. ज्या गोष्टी आपल्याबरोबर इतरांच्या निर्णयावरही अवलंबून असतात अशा वेळेस त्यांनाही आपल्यासोबत घ्यावं लागतं. ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे अशा व्यक्तीला पैसा देवून, अहंकारी व्यक्तीला हाथ जोडून, मूर्खाची गोष्ट मान्य करून आणी विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकतं.
> काही धनाचे लोभी तर काही अहंकारी असतात. काही लोक मूर्ख तर काही बुद्धिमान... या सर्वांना वश करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, लोभी माणसाला पैसा देऊन वश केले जाऊ शकते.
> जे लोक अहंकारात बुडून गेलेले असतात त्यांना हात जोडून किंवा त्यांचा योग्य मान-सन्मान करून वश करता येऊ शकतं. एखाद्या मूर्ख व्यक्तीला वश करावयाचं असेल तर तो सांगेल त्याप्रमाणे वागणे योग्य ठरते. खोट्या प्रशंसेनं मूर्ख व्यक्ती सहजतेनं वश होतो. त्याउलट एखाद्या विद्वान व्यक्तीला वश करण्यासाठी त्याच्यासमोर फक्त सत्य बोलाव.
> पोहायचं असेल तर आशेच्या सागरात पोहावं, निराशेच्या सागरात पोहून काय फायदा. आशेचा अंत जीवनाचा अंत आहे. निराशा म्हणजे मृत्यूच.
> परोपकार माणसाचा सगळ्यात मोठा गुण आहे. एखादी व्यक्ती परोपकारी नसेल, तर त्या व्यक्तीत व भिंतीवर टांगलेल्या फोटोत काय फरक?
> जीवनात यशस्वी असलेल्या व्यक्तीकडे पाहिल्यास त्याच्या जीवनात सर्व काही व्यवस्थित दिसते. तिथे प्रत्येक गोष्ट आरशासारखी स्वच्छ असते.
> परमेश्वराने आपल्याला दोन डोळे, दोन कान दिले आहेत; मात्र जीभ एकच आहे. याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे; मात्र बोलावे मोजकेच.
> तुम्हाला एक क्षण जरी सवड मिळाली, तरी तो क्षण सत्कारणी लावा. कारण कालचक्र तुमच्यापेक्षा क्रूर, उपद्रवी आहे.
या अनमोल जीवनाला गमावलेल्या संधींची कहाणी बनू देऊ नका. चांगली संधी मिळताच तुटून पडा. मागे मुळीच फिरून पाहू नका.