फेंगशुईनुसार चिनी नाण्याने मिळते धनसंपत्ती

आपण ‍तीन चिनी नाणी लाल रंगाच्या धाग्याने किंवा फितीने बांधू शकता आणि ती आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा बटव्यात ठेवू शकता.

Updated: Apr 27, 2013, 07:48 AM IST

www.24taas.com
धनप्राप्तीसंबंधीचे भाग्य क्रियाशील करण्यासाठी चिनी नाण्यांचा उपयोग हा खूपच प्रभावकारी आहे. आपण ‍तीन चिनी नाणी लाल रंगाच्या धाग्याने किंवा फितीने बांधू शकता आणि ती आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा बटव्यात ठेवू शकता. आपल्याला सतत मिळणार्‍या मिळकतीच्या उगमस्‍थानाचे हे प्रतीक आहे.
आपण चार किंवा पाच नाण्यांऐवजी तीन नाण्यांचा उपयोग करू शकता, कारण चिनी परंपरेनुसार तीन हा अंक खूपच भाग्याशाली आहे. ही नाणी लाला रंगाच्या धाग्याने किंवा फितीने बांधणे खूपच आवश्यक आहे. कारण लाल रंगाचा धागा किंवा फीत ही नाण्यांना क्रियाशील करते आणि त्यातून यांग ऊर्जा प्रगट होते. ही नाणी व्यक्तीला भेट म्हणून देणे, हे खूपच शुभकारक मानले जाते.
जर आपण कोणाला भेटीदाखल कोणती ही वस्तू देत असाल, तर त्या वस्तूबरोबर ही नाणी ही देता येतात. कारण हेसुद्धा अतिशुभ मानले जाते. ही प्राचीन चिनी नाणी वर्तुळाकार असतात आणि त्यामध्ये एक चौकोनी छिद्र असते.