मुंबई : यंदाच्या वर्षातील हे एकमेव सूर्यग्रहण ८ आणि ९ मार्चला जगभरात दिसणार आहे. या सूर्यग्रहणाबाबतचे महत्त्वाचे फॅक्टस घ्या जाणून
१. सूर्यग्रहण इंडोनेशिया, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर येथे दिसेल.
२. भारतात अंशत: सूर्यग्रहण होईल आणि काही भागांमध्ये सकाळच्या वेळेस दिसेल.
३. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते.
४. हा एक अद्भुत दृश्य असते जे १-२ वर्षात पृथ्वीच्या काही भागांवर दिसते. अखेरचे सूर्यग्रहण २०१५मध्ये २० मार्चला दिसले होते.
५. भारतात अखेरचे सूर्यग्रहण २२ जुलै २००९मध्ये दिसले होते.
६. आश्चर्यजनक बाब म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरुन सूर्यग्रहण दिसत नाही.