मोरपीस घरात ठेवण्याचे हे आहेत ५ फायदे

मुंबई : आपल्यापैकी अनेक जण शोभेसाठी म्हणून का होई ना घरात मोरपीस ठेवतात. मोरपीस आकर्षक तर दिसतेच, पण, त्याते ज्योतिषशास्त्रानुसार काही फायदेही आहेत. 

Updated: Mar 31, 2016, 11:08 AM IST
मोरपीस घरात ठेवण्याचे हे आहेत ५ फायदे  title=

मुंबई : आपल्यापैकी अनेक जण शोभेसाठी म्हणून का होई ना घरात मोरपीस ठेवतात. मोरपीस आकर्षक तर दिसतेच, पण, त्याते ज्योतिषशास्त्रानुसार काही फायदेही आहेत. 

मोरपीस घरात ठेवल्याने ते फायदेशीर ठरू शकते, असे काही जणांचे म्हणणे आहे. एक मोरपीस आपले भाग्य बदलू शकते अशी काहींची धारणा असते. पण, त्यासाठी हे मोरपीस योग्य दिशेला ठेवणेही गरजेचे आहे. 

१. घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते. तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही. 

२.  एखाद्या मंदिरातील राधा कृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस ४० दिवसांसाठी लावावे. त्या मूर्तीला तुप-साखरेचा नैवेद्य दररोज दाखवावा आणि ४१व्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे. यामुळे घरात सुख संपत्तीचा प्रवाह वाढतो अशी धारणा आहे. 

३. काल सर्प दोष दूर करण्यासाचीही अपार शक्ती मोरपिसात असल्याचे म्हटले जाते. ज्यांना कालसर्प योगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीत सात मोरपीसे टाकावीत. दररोज झोपताना याच उशीचा वापर करावा. तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीत कमी ११ पिसे असणारा पंखा लावावा. 

४. मस्तीखोर मुलाला शांत करायचे असल्यास तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपिसे बांधा. पंखा फिरताना मोरपिसांद्वारे आलेली हवा तुमच्या मुलाला शांत करू शकेल. 

५. नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपिस ठेवा. यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते.