www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाबाबत आणि रेल्वे स्टेशनच्या नामकरणाबाबत चांगलचं राजकारण रंगू लागलं.
शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी मागणी केली आहे की, मुंबई-गोवा एक्सप्रेस हायवेला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, तर एक नगरसेवक रमेश कोरगांवकर यांनी म्हटलं आहे की, दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्टेशनला बाळासाहेब ठाकरे याचं नाव देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावावरून आता राजकारण चांगलचं तापू लागलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं स्मारक कुठे व्हावं आणि बाळासाहेबांचं नाव कशा-कशाला दिलं जावं, याबद्दलच्या वेगवेगळ्या मागण्या आता पुढे येत आहेत. त्यातच मनसेनं वेगळा पवित्रा घेत बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलमध्ये उभारलं जावं अशी मागणी केली होती.