काँग्रेसचा राजा तर नागवा- बाळासाहेब

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देताना काँग्रेसवर ठाकरी हल्ला चढवलाय. ‘सर्वत्र अंधाराचे राज्य आहे. राजा नागडा असला तरी प्रजा कोडगी नाही हे दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र आणि देशातून काँग्रेसला कायमचे उखडून फेका,’ असे आवाहन ठाकरे यांनी केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 13, 2012, 03:59 PM IST

www.24taas.com,मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देताना काँग्रेसवर ठाकरी हल्ला चढवलाय. ‘सर्वत्र अंधाराचे राज्य आहे. राजा नागडा असला तरी प्रजा कोडगी नाही हे दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र आणि देशातून काँग्रेसला कायमचे उखडून फेका,’ असे आवाहन ठाकरे यांनी केले.
‘माझी प्रकृती सध्या बरी नसली तरी देशाची प्रकृती आमच्यापेक्षा जास्त बिघडली आहे. या देशाला काँग्रेसरूपी कॅन्सरने ग्रासले आहे. सारा देश सडला आहे’ असे ठाकरे यांनी म्हटलेय.
‘दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. काँग्रेस राजवटीत आनंदाचा दुष्काळ आणि प्रकाशाचे भारनियमन संपण्याची लक्षणे नाहीत. शेतकर्यांशवर अमानुष अत्याचार आणि गोळीबार सुरूच आहे. महाराष्ट्र आज भारनियमनमुक्त होईल, उद्या होईल, असे फक्त वायदेच सुरू आहेत. सण येतात, सण जातात, पण भारनियमनातून सुटका होत नाही. बाकी देशात आणि महाराष्ट्रात जनतेच्या नशिबी फक्त समस्याच आहेत, असे सरकार कशाला हवे, असा सवाल ठाकरे यांनी विचारला आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध, महागाईविरुद्ध, स्वीस बँकेतील काळ्या पैशांविरुद्ध नरडी गरम करूनही सरकारला त्याचे काही पडले नाही. पाकिस्तानची घुसखोरी आणि दहशतवाद वाढतच आहे. मात्र पाकिस्तानशी क्रिकेट खेळल्यामुळे सर्व प्रश्ना सुटतील असे देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेच सांगत असल्याने कसाब, अफझल गुरूने तुरुंगात मिळणार्या् बिर्याणीबरोबर आता पाकिस्तानबरोबर होणार्यान क्रिकेट मॅचचे तिकीट गृहमंत्र्यांकडे मागितले असेल आणि पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी काँग्रेसचे मंत्री कसाब आणि अफझल गुरूला मांडीवर बसवून क्रिकेटचे सामने पाहतील, इतका निर्लज्जपणा आमच्या राज्यकर्त्यांच्या अंगात भिनलेला आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
या काँग्रेजी नरकासुरांचा वध केल्याशिवाय देशाच्या व जनतेच्या जीवनातील अंधार दूर होणार नाही. प्रकाशाचा सण असूनही लोकांच्या जीवनात अंधार निर्माण करणार्याव काँग्रेसरूपी नरकासुरांना ठेचण्याची हिंमत जनता जनार्दनात निर्माण व्हावी हीच आई जगदंबेचरणी व शिवचरणी प्रार्थना करीत आहे. माझ्या प्रकृतीस आराम पडणारच आहे. कारण लाखो निष्ठावंत शिवसैनिकांच्या व मराठी बांधवांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत, असे ते म्हणालेत.