अल्पवयीन बाईकर्सपुढे कायद्याचा `ब्रेक फेल`!

सध्या रस्त्यावर सगळीकडेच अल्पवयीन मुलं मुली बिनधास्त गाडी चालवताना दिसतात.. त्यांना ना कायद्याची भिती ना अपघाताची चिंता... फक्त गाडी वेगानं फिरवणं इतकच त्यांना माहिती असतं..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 14, 2013, 05:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
सध्या रस्त्यावर सगळीकडेच अल्पवयीन मुलं मुली बिनधास्त गाडी चालवताना दिसतात.. त्यांना ना कायद्याची भिती ना अपघाताची चिंता... फक्त गाडी वेगानं फिरवणं इतकच त्यांना माहिती असतं.. यामुळे अनेकवेळा अपघातही होतात कित्येक निष्पाप मुलांनी या मुळं आपला जीव गमावला आहे..
मात्र याला जबाबदार कोण मुलं की पालक? अशाच अल्पवयीन गाडी चालवणा-या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या विरोधात औरंगाबाद पोलिसांनी आता मोहिम उघडली आहे
कॉलेजात प्रवेश केलेली मुलं-मुली प्रेस्टीज म्हणून गाडीनं येतात. आणि रस्त्यानं भीतीविना गाड्या हाकतात. खरं तरं अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणं हा कायद्यानं गुन्हा आहे. याची जाणीव ना मुलांना आहे ना पालकांना... त्यामुळे हे कॉलेजकुमार बिनधास्तपणे गाडी चालवतात. या बाईकबहाद्दारांना चाप लावण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी मोहिम सुरु केली आहे. मात्र कायद्यानुसार पोलिसांचे हात बांधले गेले असल्यानं त्यांना केवळ आर्थिक दंड आकारुन मुलांना सोडावं लागतं.
मोटार व्हेईकल एक्ट कलम 4/181 प्रमाणे अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास त्यांना 300 रुपये दंड होतो. पालकांवर कलम 5/180 प्रमाणे कारवाई होते आणि त्यांनाही 300 रुपये दंडाची तरतूद आहे. एकच मुलगा दुस-यांदा गुन्हा करताना सापडल्यास त्याला कोर्टात हजर करूनही फक्त दंडात्मक कारवाईच कऱण्यात येते.

गेल्या 15 दिवसांत औरंगाबाद पोलिसांनी 400 मुलांवर कारवाई करण्यात आलीय. तर 70 पालकांवर कोर्टकडून दंडात्मक कारवाई झालीय. तरीही पालकांवर काहीच परिणाम होत नसल्याचं पोलिस सांगतायत. दंड भरल्यानंतर काही पालक चूक झाल्याचं मान्य करतात तर बस आणि इतर सोय नसल्यानं नाईलाजानं गाडी चालवावी लागत असल्याचं मुलांनी सांगितलंय. गाडी चालवण्याच्या हौसेपेक्षा जीव मोठा आहे. हेच या बेभान बाईकस्वारांना आणि त्यांच्या पालकांना समजवण्याची वेळ आता आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.