www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ
यवतमाळमध्ये एका पोलिसाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय. जिल्हा परिषद शिक्षण सभापतीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या विशाल अशोकराव पोटदुखे याने स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली.
पळसवाडी येथील पोलीस वसाहतीतील आपल्या निवासस्थानी विशालनं सोमवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास आपल्या मैत्रिणीसमोर कानशिलात गोळी झाडून घेतली. सोमवारी रात्री ‘विशालनं फोन करून मी आत्महत्या करणार असल्याचे सांगितलं, त्यामुळे घाबरुन मी त्याच्या घरी गेले… मी त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला... पण, माझ्या विरोधाला न जुमानता त्याने माझ्यासमोरच स्वत:ला गोळी झाडून घेतली’ अशी माहिती विशालच्या मैत्रिणीनं पोलिसांना दिलीय.
आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या ९ एमएम या बंदुकीनं विशालनं स्वत:वर गोळी झाडली. मैत्रिणीची किंचाळी ऐकून शेजारचे लोक घरात आले तेव्हा विशाल रक्ताच्या थारोळ्यात पलंगावर मृतावस्थेत पडलेला. त्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मात्र, या थरारक घटनेने जिल्हा पोलीस दल आणि आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.