कल्पना गिरी हत्याप्रकरणाचा तपास आता CID कडे

लातूरमधील काँग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी त्यासंदर्भात आदेश दिलाय. पोलीस महालसंचालकांनी तशी माहिती लातूर पोलिसांना दिली आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 10, 2014, 03:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लातूर
लातूरमधील काँग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी त्यासंदर्भात आदेश दिलाय. पोलीस महालसंचालकांनी तशी माहिती लातूर पोलिसांना दिली आहे.
तसंच या प्रकरणात सरकारच्यावतीनं कोर्टात बाजू मांडण्यासाठी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, अशी शिफारसही सरकारकडे करण्यात आली आहे.
व्यवसायानं वकील आणि स्थानिक युवक काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या कल्पना गिरी यांचा रंगपंचमीच्या दिवशी खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह तुळजापूरजवळच्या पाचुंदा तलावात सापडला होता. या प्रकरणाची लातूर जिल्ह्यात बरीच चर्चा होतेय. तसंच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी देखील चंद्रपूर इथं घेतलेल्या सभेत या प्रकरणाचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.
या हत्येप्रकरणी लातूर पोलिसांनी महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर यांना अटक केली आहे. त्यातल्या चौहान या आरोपीनं कल्पना गिरीला तलावात ढकलून देऊन ठार केल्याची कबुली दिली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.