तुळजापुरातील महालक्ष्मीचे सोन्याचे दागिने चोरीला

दरोडेखोरांनी मंदिराच्या पूजा-यावर, तलवारीने हल्ला करून, महालक्ष्मी देवीचे सोन्याचे दागिने आणि मुखवटा पळवून नेल्याची खळबळजनक घटना, तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे घडलीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 6, 2013, 02:58 PM IST

www.24taas.com, तुळजापूर
दरोडेखोरांनी मंदिराच्या पूजा-यावर, तलवारीने हल्ला करून, महालक्ष्मी देवीचे सोन्याचे दागिने आणि मुखवटा पळवून नेल्याची खळबळजनक घटना, तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे घडलीये.

दरोडेखोरांच्या हल्ल्यात मंदिराच्या पुजा-या सह तीन जण गंभीर जखमी झालेत. हे महालक्ष्मी मंदिर गावापासून २ किमी अंतरावरील निर्जन डोंगरामध्ये आहे.
मंगळवारी संध्याकाळी अलंकार पूजे नंतर मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि मुखवठे गावाकडे घेवून जात असताना, रस्त्यात दरोडेखोरांनी अचानक हल्ला केला आणि पूजा-याकडील मौल्यवान दागिने पळवले. या दागीन्यांची किंमत २५ ते ३० लाखांच्या घरात असल्याचं ग्रामस्थांच म्हणणं आहे.

चिवरीची महालक्ष्मी ही महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचं मोठे श्रद्धास्थान आहे.. त्यामुळे या चोरीच्या घटनेनं नागरिकांत संतापाचं वातावरण पसरलंय.