पत्नीच्या पीएचडीसाठी पतीने केली वॉचमनची नोकरी

पत्नीच्या पीएच.डी.साठी औरंगाबादेत एका पतीने चक्क वॉचमनची नोकरी पत्करली आणि पत्नीच्या शिक्षणाला हातभार लावला....

Updated: Feb 2, 2013, 05:40 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, हे सातत्यानं कानावर पडतं आलयं...मात्र आजकालच्या स्त्री अत्याचाराचा आगडोंब उसळलेल्या काळात एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा पती पाय रोवून उभा असल्याचं उदाहरण दुर्मिळच पत्नीच्या पीएच.डी.साठी औरंगाबादेत एका पतीने चक्क वॉचमनची नोकरी पत्करली आणि पत्नीच्या शिक्षणाला हातभार लावला....
भीमराव यांचं कौतुक करावं तितक थोडचं...कारण, भीमराव यांनी केवळ आपल्या पत्नीच्या पीएचडीच्या शिक्षणासाठी वॉचमनची नोकरी पत्करली. औरंगाबाद विद्यापीठातच भीमराव आणि वंदना यांची ओळख झाली...दोघंही इतिहास विषयाचेच विद्यार्थी...दोघांनाही एम.ए. करत असतानाच इतिहासात पीएचडी करण्याची इच्छा होती. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने पुढचं शिक्षण कसं घेणार हा प्रश्न होता...
मात्र, भीमरावांनी पत्नीच्या इच्छेखातर तिला पुढचं शिक्षण देण्याचा पण केला... आणि त्यांनी चक्क विद्यापीठातच वॉचमनची नोकरी पत्करली... ही वॉचमनची नोकरी पत्करण्यामागेही भीमराव यांचा स्वार्थी हेतू होता... तो म्हणजे, रात्रभर नोकरी करून, दिवसा ते पत्नीला तिच्या संशोधनात मदत आणि घर सांभाळायला मदत करू शकत होते. वंदना यांनीही आपल्या पतीचा विश्वास सार्थ ठरवत जोमानं अभ्यास केला आणि चार वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी "भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महाराष्ट्रीय स्त्रियांचे योगदान (1857-1947)` या विषयात शोधनिबंध सादर करून पीएच.डी.ची पदवी मिळवली.

अतिशय संघर्षमय परिस्थितीत वंदनाचं पीएचडीचं स्वप्न साकारं झाल्याचा अभिमान भीमराव यांच्या चेह-यावर दिसतो. वंदनालासुद्धा आपल्या नव-याच्या अमूल्य योगदानाबाद्दल बोलताना गहिवरून आलं. भीमराव यांनी आपला स्वाभिमान बाजूला ठेवून आपल्या पत्नीसाठी केलेली अहोरात्र मेहनत खरचं कौतुकास्पद आहे..