आय-बहीण आजही विटंबली जाते

कवि नामदेव ढसाळांनी जातिप्रथा, परंपरेविरुध्द, सामाजिक अन्यायाविरुध्द कवितेतून आवाज उठवला. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द आजही विद्रोह करतो, शिकवतो, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो ही त्यांची कविता आजही जातीव्यवस्थेचं आणि स्त्रीयांवरील अन्यायाचं उत्कट चित्र मांडते.

Updated: Jan 15, 2014, 02:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कवि नामदेव ढसाळांनी जातिप्रथा, परंपरेविरुध्द, सामाजिक अन्यायाविरुध्द कवितेतून आवाज उठवला. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द आजही विद्रोह करतो, शिकवतो, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो ही त्यांची कविता आजही जातीव्यवस्थेचं आणि स्त्रीयांवरील अन्यायाचं उत्कट चित्र मांडते.
नामदेव ढसाळ यांच्या कविता तळागाळातील माणसांना गुलामगिरीतून आलेल्या उध्वस्तपणाची जाणीव करून देतात, आणि पेटून उठण्यास भाग पाडतात.
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून...
मवाल्या सारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्ती सारखी जाळतात माणसं
चौकाचौकातून...
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिँदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यँत राहायचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिँदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला ...
आग लावत चला ...
कवि- नामदेव ढसाळ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.